मारुती सुझुकी गाड्यांच्या किंमती पुढील महिन्यापासून वाढणार | पुढारी

मारुती सुझुकी गाड्यांच्या किंमती पुढील महिन्यापासून वाढणार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मारुती सुझुकी इंडिया आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत सप्टेबर २०२१ पासून वाढ करणार आहे. याची घोषणा त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये केली होती. पण, या किंमती कशा प्रमाणात वाढणार आहेत याबाबतची माहिती मात्र कंपनीने अजून उघड केलेली नाही.

मारुती सुझुकी ने या किंमतीत वाढ करण्याचे कारण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात झालेली वाढ असल्याचे सांगितले. मारुती सुझुकी जर उत्पादन प्रक्रियेतील खर्चामुळे किंमती वाढणार आहेत असे म्हणत असले तरी ही किंमतवाढ अपेक्षित होती. मारुती सुझुकीने जून २०१२ मध्येच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये किंमत वाढ होणार असल्याची घोषणा केली होती. ही किंमतवाढ आर्थिक वर्ष २०२१ – २२ च्या दुसऱ्या तिमाहीत होणार असल्याचे सांगितले होते.

उत्पादन खर्चात वाढ

आपल्या अधिकृत वक्तव्यात मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, ‘आम्ही किंमत वाढीसंदर्भात आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कळवत आहोत की गेल्या काही वर्षातील आमच्या गाड्यांच्या किंमतीवर उत्पादन खर्च वाढल्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच, हा विपरित परिणाम थोडा कमी करण्यासाठी आम्ही आमच्या गाड्यांच्या किंमतीत थोडी वाढ करत आहोत. ही किंमतवाढ जवळपास सर्व मॉडेल्सला सप्टेंबर २०२१ पासून लागू करण्याचे नियोजन आहे.’

वर्षात तिसरी भाववाढ

सध्या, मारुती सुझुकीने आधीच आपल्या हॅचबँक स्विफ्टची किंमत वाढवली आहे. याचबरोबर त्यांच्या सर्व सीएनजी गाड्याच्या किंमती ज्या सध्याच्या तिमाहीत जुलै २०२१ मध्ये येणार आहेत त्यांच्याही किंमती वाढवल्या आहेत. त्यांनी या किंमती १५ हजार पासून वाढवल्या आहेत. या किंमती गाड्यांचे व्हिरियंट आणि मॉडेल्सनुसार वेगवेगळ्या आहेत. आता पेट्रोल मॉडेल्सच्या किंमती वाढणार आहेत.

पण, आधी वाढलेल्या स्विफ्ट आणि सीएनजी मॉडलेच्या किंमतीत पुन्हा सुधारणा होणार आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. या वर्षी मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत तिसऱ्यांदा वाढ करणार आहे. यापूर्वी मारुतीने जानेवारी २०२१ मध्ये आपल्या विशिष्ट मॉडेल्सच्या किंमती ३४ हजारापासून पुढे वाढवल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा किंमती वाढवण्यात आल्या. या दोन्ही वेळा मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचे कारण उत्पादन खर्चात झालेली वाढच सांगितले होते.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : पुणे वाहतूक पोलिसांची सामान्यांवर मुजोरी

Back to top button