RVSF : ‘या’ गाड्या स्क्रॅप होणार! सरकारचे नियम जाणून घ्या…

RVSF : 'ही' वाहनं स्क्रॅप होणार! सरकारचे नियम जाणून घ्या...
RVSF : 'ही' वाहनं स्क्रॅप होणार! सरकारचे नियम जाणून घ्या...
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात असणारी जुनी वाहने भंगारात पाठविली जाणार आहेत, असा धोरण सरकारने नुकतच जाहीर केले आहे. त्या धोरणाला 'वाहन स्क्रॅप धोरण', असं संबोधण्यात आलं आहे. वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी देशभरात ४५० ते ५०० नोंदणी असलेल्या वाहनासाठी स्क्रॅपिंग सुविधा (RVSF) उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या RVSF वर कोण-कोणती वाहने स्क्रॅप केली जातील याचेही नियम निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून या नियमांसंदर्भात माहिती दिली आहे. तर कोणत्या प्रकारातील वाहने स्क्रॅप होणार ते नियम पुढील प्रमाणे…

१) ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यू होणार नाही : त्यानुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम -५२ नुसार ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यू होणार नाही, ती वाहने RSVF वर स्रॅप केले जाऊ शकतील. नियम -52 वाहनाची नोंदणी संपण्यापूर्वी त्याच्या रिन्यू करण्याशी संबंधित आहे.

२) ज्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही : ज्या वाहनांना मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम – ६२ नुसार फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही, अशी वाहनेही RSVF वर स्क्रॅप केली जाऊ शकतील. याशिवाय एखाद्या एजन्सीने स्क्रॅफ करण्यासाठी लिलावात खरेदी केलेली वाहनेदेखील स्कॅप होऊ शकतील. RSVF देखील लिलावामध्ये वाहने विक घेऊ शकतात.

3) दंगली अथवा आपत्तीमध्ये खराब झालेली वाहने : जी वाहने, आग, दंगल, नैसर्गिक आपत्ती, अपघात अथवा इतर कुण्या आपत्तीत खराब झाली असतील आणि त्या वाहनांचे मालक स्वतः त्यांना भंगार म्हणून घोषित करत असतील, तर ती RSVF वर स्क्रॅप केली जाऊ शकतात.

४) कालबाह्य वाहने : जी वाहने केंद्र अथवा राज्य सरकारद्वारे कालबाह्य म्हणून बाहेर काढली जातील, जी वाहने सरप्लस असतील अथवा दुरुस्त केले जाऊ शकत नसतील, अशी वाहने RSVF कडे स्क्रॅपिंगसाठी पाठविली जातील. या व्यतिरिक्त, एखाद्या कायदेशीर एजन्सीने ज्या वाहनांचा लिलाव केला आहे, जप्त केली आहेत अथवा बेवारस पडलेली आहे, अशी वाहने RSVF वर स्क्रॅप केली जातील.

५) खाण इत्यादींशी संबंधित वाहने : ज्या वाहनांचा वापर खाणकाम, महामार्ग बांधकाम, शेती, वीज, कारखाने किंवा विमानतळ इत्यादी प्रकल्पांसाठी केला जातो किंवा ज्या वाहनांचा काळ पूर्ण झाला आहे आणि आता ती काहीही कामाची राहिली नाहीत, अशी वाहने मालकाच्या संमतीने स्क्रॅपिंगसाठी पाठविली जातील. याशिवाय, जो मालक त्याच्या इच्छेने त्याचे वाहन स्क्रॅप करण्यासाठी पाठवेल, ते RSVF वर स्क्रॅप केले जाईल.

६) टेस्टिंग, प्रोटोटाइप व्हेइकल स्क्रॅप होणार : अशी वाहने, जी मॅन्युफॅक्चरिंगदरम्यान रिजेक्ट होतील, जी वाहने टेस्टिंग व्हेइकल अथवा प्रोटोटाइप असतील, जी वाहने कारखान्यातून डीलरपर्यंत जाताना खराब होतील अथवा जी वाहने बिना विक्रीची राहतील, अशी सर्व वाहने संबंधित कंपनीच्या मंजुरीनंतर RSVF वर स्क्रॅप केले जाऊ शकतील.

पहा व्हिडीओ : या करतायत महिला मंगळागौरीच्या परंपरेचं जतन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news