Electric Car: टाटाची ‘ही’ इलेक्ट्रीक कार ६० मिनिटात होते ८० टक्के चार्ज! | पुढारी

Electric Car: टाटाची ‘ही’ इलेक्ट्रीक कार ६० मिनिटात होते ८० टक्के चार्ज!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Tata Electric Car टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी आपली नवीन इलेक्ट्रिक कार ‘टिगोर ईव्ही’ (Tigor EV) भारतात सादर केली आहे. कंपनीने या कारमधील अनेक वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली आहे.

टाटाचा दावा आहे की टिगोर ईव्ही इलेक्ट्रिक कार फक्त 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडू शकते. कारचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. 31 ऑगस्टपासून कारच्या विक्रीस सुरुवात होईल.

अधिक वाचा :

टाटा टिगोर ईव्हीची आकर्षक झलक
टाटा टिगोर ईव्हीची आकर्षक झलक

आतापर्यंत, टिगोर ईव्ही फक्त सरकारी अधिकारी आणि फ्लीट ऑपरेटरसाठी उपलब्ध केले जात होते. परंतु, 31 ऑगस्टपासून ही कार सर्वांसाठी उपलब्ध होईल.

टाटाने टिगोरची ओळख करून देण्याबरोबरच त्याचे बुकिंग सुरू केले. जर तुम्हाला ही कार खरेदी करण्यात स्वारस्य असेल, तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा तुमच्या जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये टिगोर इलेक्ट्रिक कार बुक करू शकता.

मात्र या कारची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पण काही अहवालानुसार या इलेक्ट्रिक कारची किंमत टिगोरच्या नॉन-इलेक्ट्रिक आवृत्तीपेक्षा जास्त असेल.

अधिक वाचा :

पॉवर, रेंज इत्यादी वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर कंपनीने टिगोर ईव्ही या कारची निर्मिती झिपट्रॉन पॉवरट्रेन तंत्रज्ञानावर केली आहे. टाटा टिगोर ईव्ही ही 5-सीटर इलेक्ट्रिक कार आहे. 72V 3 फेज एसी इंडक्शन मोटरसह येते. ही मोटर 40.23 bhp पीक पॉवर आणि 105 Nm मॅक्स टॉर्क जनरेट करते.

टाटा टिगोर ईव्हीची आकर्षक झलक
टाटा टिगोर ईव्हीची आकर्षक झलक

टाटा झिपट्रॉनवर चालणारी वाहने उच्च-व्होल्टेज 300+ व्होल्ट स्थायी चुंबकीय सिंक्रोनास इलेक्ट्रिक मोटरसह येतात. नेक्सॉन ईव्ही (Nexon EV)ला 30.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो, तर Tigor EV मध्ये कंपनीने 26 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरला आहे.

याद्वारे Tigor EV एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 213 किमीपर्यंत रेंज देते. फास्ट चार्जिंगद्वारे बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 2 तासांचा वेळ लागतो. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 80 Kmph असून ग्राउंड क्लीअरन्स 176mm आणि बूट स्पेस 255L आहे.

नवीन टाटा टिगोर ईव्हीची मोटर 75 एचपी आणि 170 एनएम टॉर्क बनवते, जे नेक्सन ईव्ही पेक्षा कमी आहे. पण तरीही ते एक्सप्रेस-टी (34 एचपी आणि 65 एनएम) पेक्षा जास्त आहे.

याव्यतिरिक्त, झिपट्रॉन तंत्रज्ञानामुळे टिगोर ईव्हीला सुमारे एक तासाच्या कालावधीत 0 ते 80 टक्के चार्ज करता येईल. कंपनी कारच्या बॅटरी आणि मोटरसह 8 वर्षे/1 लाख 60 हजार किमीची वॉरंटी देखील देत आहे. टिगोर ईव्हीच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही घोषणा केलेली नाही. पण, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही कार 13.99 लाख ते 16.85 लाख रुपयांच्या दरम्यान मिळू शकते.

Back to top button