काँग्रेसने काढली आझादी गौरव यात्रा; राहुल-प्रियांका गांधी यांचा सहभाग
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : चे औचित्य साधत काँग्रेस पक्षाकडून सोमवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये आझादी गौरव यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद यांच्यासह कार्यकर्त्यांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
असंख्य लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन आपल्या परीने योगदान दिले. या लोकांबरोबरच स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध होण्याची गरज असल्याचे प्रियांका गांधी-वधेरा यांनी नमूद केले. काँग्रेस मुख्यालय ते गांधी स्मृती दरम्यान काँग्रेसकडून आझादी गौरव यात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी पक्षाच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकविण्यात आला. सोनिया गांधी यांना कोरोना झालेला असल्याने त्या कार्यक्रमात भाग घेऊ शकल्या नाहीत.
हेही वाचलंत का?
- अलमट्टीतून २ लाख २५ हजार विसर्ग सुरूच : कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट
- India @ 75 : 'त्या' भेटीनंतर डॉक्टर लक्ष्मी बनल्या कॅप्टन लक्ष्मी, ठरल्या आशियातील पहिल्या महिला कर्नल…
- दहा रुपयांच्या रिचार्जमध्ये तहहयात चालू राहील फोन! : 'युनिनॉर'ची आंध्र प्रदेशमध्ये सुविधा
- Independence Day 2022 : घराणेशाहीच्या राजकारणावर पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार, वाचा भाषणातील ठळक मुद्दे