शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडून टाका, अधिकाऱ्याचे पोलिसांना आदेश (video)

कर्नाल; पुढारी ऑनलाईन : शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडून टाका : मोदी सरकारने केलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांचा गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष अजूनही कायम आहे.
हे प्रकरण ताजे असतानाच आता धक्कादायक आणि तालिबानी प्रवृत्तीचा आठवण करून देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कर्नालचे उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा पोलीसांना थेट शेतकऱ्यांची डोकी फोडण्यास सांगत आहेत. इतकेच नाही, तर काही शंका आहे का? अशे निक्षून विचारतात, पोलीसही आदेश शिरसावंद्य मानून काही नाही सर म्हणून मान डोलावतात. या व्हिडिओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
- भाविना पटेलने इतिहास रचला! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी!
- शिवसेना आणखी एक ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार : संजय राऊत
काल हरियाणामध्ये भाजपच्या बैठकीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांना काल अमानुष मारहाण करण्यात आली. या लाठीमारात १० शेतकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, या बैठकीला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व भाजप प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडून टाका
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उप न्यायदंडाधिकारी आयुष शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी सांगताना म्हणतात की, तो कोणीही असू दे, कुठलाही असो त्यांना तिकडे जाऊ देऊ नका. कोणालाच जाऊ देऊ नका, काठी उचलून जोरात मारा. कोणत्या सूचनांची आवश्यकता नाही, फक्त जोरात मारा. मला या ठिकाणी एकही आंदोलक दिसला तर त्याचं डोकं फुटलं पाहिजे. काही शंका? पोलीस म्हणतात, नाही सर.
या व्हिडिओनंतर आता संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे वरुण गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, मला आशा आहे हा व्हिडिओ एडिट केला गेला असेल आणि डीएमने तसे म्हटलं नसेल. अन्यथा लोकशाही भारतात आपल्या स्वतःच्या नागरिकांना असे करणे अस्वीकार्य आहे.
I hope this video is edited and the DM did not say this… Otherwise, this is unacceptable in democratic India to do to our own citizens. pic.twitter.com/rWRFSD2FRH
— Varun Gandhi (@varungandhi80) August 28, 2021
या कारवाईचा तीव्र निषेध करत ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले, “खट्टर साहेब, आज तुम्ही हरियाणवीच्या आत्म्यावर लाठीमार केलात. येणाऱ्या पिढ्यांना रस्त्यावर सांडलेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताची आठवण येईल.
हे ही वाचलं का?