अबब! पोटातून ५० हून अधिक क्वॉइन्स काढली शस्त्रक्रियेविना

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोटात ५० हून अधिक क्वॉइन्स होते आणि तेही श्त्रक्रियेविना काढण्यात आले आहेत. तुम्हाला पण प्रश्न पडला आहे का? एवढे क्वॉइन्स कसे काय शस्त्रक्रियेविना काढले असतील आणि एवढी नाणी पोटात गेली कशी काय? पण असं घडलंय राजस्थानात. ही घटना घडली आहे राजस्थानमधील जोधपूर शहरात. तेथील एका डॉक्टरांनी चक्क एका ४० वर्षीय व्यक्तीच्या पोटातून पन्नासहून अधिक क्वॉइन्स शस्त्रक्रियेविना काढण्यात आली आहेत. या रुग्णाची आणि डॉक्टरची चर्चा सोशल परिसरात सुरु झाली आहे.
५० हून अधिक धातूची नाणी
40 वर्षीय या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांनी पोटात जास्त दुखत असल्याने जोधपूर शहरातील सर्वात मोठे हॉस्पिटल असलेल्या मथुरादास माथूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एंडोस्कोपी दरम्यान लक्षात आले की त्याच्या पोटात धातूची नाणी आहेत. विभागातील वरिष्ठ डॉक्टर सुनील दधीच यांनी सांगितले की, “पोटात बरीच नाणी असल्यामुळे त्यांनी ती नैसर्गिकरित्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कारण ते अन्ननलिकेतून एकावेळी एक किंवा दोन नाणी काढू शकतात. एवढी नाणी काढणे जीवावर बेतण्यासारखे होते. डॉक्टरांसाठी एवढी नाणी काढणे कठीण आव्हान होते. प्रौढ व्यक्तीच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
मानसिक आजारामुळे नाणी खाल्ली
प्रौढ व्यक्तीच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मानसिक आजारामुळे त्याने ही नाणी खाल्ल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली. त्या रुग्णानेही डॉक्टरांना सांगितले की त्याने पूर्वीही मानसिक आजारामुळे असे वर्तन केले होते.
हेही वाचलंत का?
- या सहा जणी दिसतात हुबेहुब ऐश्वर्या रायसारख्या, पाहा तुम्हाला कोण वाटते ऐश्वर्याची डुप्लिकेट
- सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत संसार थाटून ठाकरे कुटुंबीयांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली : आमदार शंभूराज देसाई
- Sudarsan Pattnaik : ‘हृदयात तिरंगा, हातात तिरंगा’… सुदर्शन पटनाईक यांचे अनाेखे वाळूशिल्प
- नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच! भीतीपोटी शिक्षकावर खोटे आरोप
- सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ संपेना; उर्दू एम.ए.च्या विद्यार्थ्यांना उत्तराच्या खुणांसह प्रश्नपत्रिका