

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालय मधील 9 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी हिरवा कंदील दाखविला. सर्वोच्च न्यायालय मधील या नऊ न्यायमूर्तींमध्ये तीन महिला न्यायमूर्तींचा समावेश आहे.
जे न्यायमूर्ती नियुक्त करण्यात आले आहेत, त्यात बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश आहे. पदोन्नती धोरणानुसार सप्टेंबर 2027 मध्ये न्यायमूर्ती नागरत्ना या देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश होऊ शकतात.
ज्या इतर आठ न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे, त्यात महिला न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्यासह न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश, माजी सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जितेंद्रकुमार माहेश्वरी यांचा समावेश आहे.