मुंबई, पुढारी ऑनलाईन: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधित जुन्या फाईल नव्याने ओपन होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याचा दुसरा अंक आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राणे यांच्या जुन्या फाईल्स ओपन होण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत सामना ये सेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत.
जामिनावर सुटल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेसोबत पुन्हा संघर्ष करण्याचे संकेत दिले आहेत.
'मी कोणालाही घाबरत नाही, मी सगळ्यांन पुरून उरलोय. शिवसेना माझं काहीही करु शकत नाही, मी त्यांच्या कोणत्याही कारवाईला घाबरत नाही.' असे राणे म्हणाले.
राणे यांचा पूर्वइतिहास पाहता ते काही गप्प बसणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत. मात्र, राणे यांच्या भूमिकेबाबत पक्षश्रेष्ठी काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
शिवाय राणे आक्रमक झाले तर त्यांचा अडचणीत आणणाऱ्या कोकणातील काही संशयास्पद गोष्टी बाहेर काढण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना राणेंविरोधात दुसरा डाव टाकण्याची शक्यता आहे. सामनाच्या अग्रलेखातून तसे संकेत दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहीजणांच्या संशयास्पद प्रकरणे झाले होते.
तेथील हत्या आणि बेपत्ता प्रकरणातील जुन्या फाइल ठाकरे सरकार पुन्हा उघडण्याची तयारी करत आहे का? असा प्रश्न आजच्या अग्रलेखामुळे समोर येतो.
राणे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
'नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती.
राणे यांना जेवणावरुन उठवणं वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचे कोणी उठवले?
या प्रकरणांचा नव्याने तपास ठाकरे सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही.'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्या हत्या झाल्या.
काहींचे मृतदेह सापडले तर काहीजण बेपत्ता आहेत.
या सर्वांच्या हत्या आणि बेपत्ता प्रकरणात राणे यांच्यावर आरोप होतो. मात्र, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.
श्रीधर नाईक यांच्या हत्या प्रकरणात राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा खटला सुरू होता.
मात्र, कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, नारायण राणे यांच्या जुन्या फाईल नव्याने उघडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने ठरवलेच तर राणे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जाऊ शकतो. हत्या आणि बेपत्ता प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावे नसले तरी त्यांचा चौकशांमध्ये गुतंवायचे अशी मेख ठाकरे सरकार मारू शकते. राणे यांनी ज्याप्रकारे सेनेला आव्हान दिले ते पाहता हा सामना रंगत जाईल असे दिसते. ठाकरे सरकारने खरोखरच या जुन्या प्रकरणांचा तपास सुरु केला तर राणे अडचणीत येतील की, संघर्ष वाढत जाईल याकडे आता लक्ष लागले आहे.