

मुंबई, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यांनंतर राज्याच्या राजकारणातील वातावरण ढवळलं गेलं. शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतप्त झाले.
युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या जुहू येथील बंगाल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राणेंना भिडणारे वरूण सरदेसाई कोण, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधू…
युवा सेनेचे सचिव असणारे वरूण सरदेसाई हे राज्याचे पर्यावरण मंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ लागतात. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे पूत्र आहेत.
पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेले वरूण सरदेसाई यांच्या युवा सेनेचे सचिव पद दिलेले असून ते शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी दिलेली आहे.
आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी पहिल्यांदा मागणी करणारे वरूण सरदेसाई होते. शिवसेनेचे (Shivsena) स्टार प्रचारक म्हणून वरूण सरदेसाई यांनी काम पाहिलं आहे.
आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी जनआशीर्वाद यात्रा काढली, त्यावेळी वरूण सरदेसाई यांचा सहभाग जास्त होता. २०१७ मधील डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंचा प्रचार केला. असा सगळ्या वातावरणात वरूण सरदेसाई विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात होती.
गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्युहरचनेतही महत्वाची भूमिका वठवलेली होती. त्यावेळी त्यांनी १० जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आली होती. पण, वरुण सरदेसाई यांना मात्र वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. त्यावरूनच नितेश राणेंनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती.
पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय?