राज्यपाल, राज्यसभा सदस्य बनवण्याची बतावणी करत १०० कोटी लाटले, पाच आरोपींवर गुन्हा, चाैघांना अटक | पुढारी

राज्यपाल, राज्यसभा सदस्य बनवण्याची बतावणी करत १०० कोटी लाटले, पाच आरोपींवर गुन्हा, चाैघांना अटक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल,राज्यसभा सदस्य बनवण्याची बतावणी करीत कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) छडा लावला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे या टोळीचे देशभरातील अनेक राज्यात ‘नेटवर्क’ असल्याचे कळतेय.

यासंबंधी तपास यंत्रणेकडून अनेक ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले होते. या कारवाई दरम्यान एक आरोपी अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात सीबीआयने लातुरमधील कमलाकर प्रेमकुमार बंदगार, कर्नाटकच्या बेळगावमधील रवींद्र विठ्ठल नाईक,दिल्ली-एनसीआर मधील महेंद्र पाल अरोडा,अभिषेक बुरा तसेच मोहम्मद एजाज खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयचा वरिष्‍ठ अधिकारी असल्‍याचीही बतावणी करत १०० कोटींची वसुली

मुख्य आरोपी प्रेमकुमार बंदगार लोकांना सीबीआयचा वरिष्ठ अधिकार असल्याची बतावणी करीत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा तो सांगायचा. मोठ्या वसुलीसाठी आरोपीने बूरा, अरोडा, नाईक तसेच खान यांची नेमणूक केली होती. राज्यसभा, राज्यपाल, केंद्रीय मंत्रालय तसेच विभागाच्या अधिनस्थ येणाऱ्या कुठल्याही सरकारी संघटनेचा अध्यक्ष बनवण्याची बतावणी या रॅकेटकडून केली जायची. या बदल्यात टोळीकडून १०० कोटी रूपयांची वसुली केली जायची. टोळीकडून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत लोकांची हे रॅकेट फसवणूक करीत होते, असे सीबीआयच्‍या तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button