कोलकाता: पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने दिला जाणारा बंग विभूषण हा पुरस्कार स्वीकारण्यास नाेबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी नकार दिला आहे. बंग विभूषण ( Bang Vibhushan ) हा पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुरस्कार स्वीकारण्यास का नकार दिला, याचे कारण अमर्त्य सेन यांच्या मुलीने सांगितले आहे.
बंग विभूषण पुरस्कार स्वीकारण्यास का नकार दिला, याबाबत माहिती देताना अमर्त्य सेन यांची मुलगी अंतरा देव सेन यांनी सागितले की, अमर्त्य सेन हे सध्या भारतात नाहीत. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ते युरोपला गेले आहेत. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित होण्याचे सौभाग्य मिळाले आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने दिला जाणारा बंग विभूषण पुरस्कार हा अन्य कोणाला तरी दिला जावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुरस्कार स्वीकारण्यास अमर्त्य सेन यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच नकार दिला होता. यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या अधिकार्यांना संपर्क केला होता. बंग विभुषण पुरस्कार वितरणावेळी मी भारतात असणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने सोमवार (दि.२५ ) या पुरस्कारचे वितरण होणार आहे.
हेही वाचा :