रक्षकच झाले भक्षक! दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्‍कार; चार पोलीस कर्मचारी अटकेत

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्ली येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे घृणास्‍पद कृत्य नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरच घडल्याचे तपासात समाेर आले असून, या प्रकरणी चार रेल्‍वे पाेलीस कर्मचार्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

मद्‍यधुंद अवस्‍थेत रेल्‍वे स्‍टेशनवर घृणास्‍पद कृत्‍य

 पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  पीडित तरुणीची एका रेल्‍वे पाेलिस कर्मचार्‍याबराेबर ओळख झाली.  त्‍याने तिला गुरुवारी रात्री रेल्‍वे स्‍टेशनवर भेटायला बाेलवले. याचवेळी त्‍याने आपल्‍या तीन मित्रांनाही बाेलवून घेतले. तरुणी  आल्‍यानंतर पाेलीस कर्मचार्‍याने रेल्‍वे स्‍टेशनवरच तिच्‍यावर बलात्‍कार केला. यानंतर मद्‍यधुंद अवस्‍थेत असणार्‍या त्‍याच्‍या एका मित्रानेही धमकावत तरुणीवर बलात्‍कार केला. यानंतर तिला रेल्‍वे स्‍टेशनवर साेडून चाैघेही घटनास्‍थळावरुन पसार झाले.

पीडित तरुणीने साधला पाेलिसांशी संपर्क

मद्‍यधुंद अवस्‍थेत असणार्‍या दाेन पाेलिस कर्मचार्‍यांनी तरुणीवर बलात्‍कार केला. तर अन्‍य दाेघांनी या कृत्‍यात त्‍यांना मदत केली. यानंतर तिला रेल्‍वे स्‍टेशनवरच फेकून देत चाैघेही घटनास्‍थळावरुन पसार झाले. पीडित तरुणीने पीसीआर कॉल करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली.

प्रकरणी चार रेल्वे पोलिसांना अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले चार पाेलीस कर्मचारी  रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागात कार्यरत आहेत. चाैघांपैकी दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दोघांनी मदत केली आहे. याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आल्‍याचे दिल्‍ली पाेलिसांच्‍या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news