चंद्रपूर : आईला माहिती देऊन लेकाने घेतले विष, ट्रकच्या केबिनमध्ये आढळून आला मृतदेह

file photo
file photo
Published on
Updated on

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : एका २८ वर्षीय युवकाने आईला स्व:त विष प्राशन करीत असल्याची माहिती देऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शुक्रवारी (दि.२२ जुलै) घडली. रितेश विनोद भोयर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील सुगत कुटी समोरील मुख्य रत्यावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये केबिनमध्ये युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मालेवाडा येथील सुगत कुटी समोरील बाजुला उभ्या असलेल्या महिंद्रा ब्लाजो (क्रमांक TS-01-UC-0265) या ट्रकच्या केबीनमधील ड्रायव्हर सिटचे पाठीमागे चालक रितेश विनोद भोयर (वय २८, रा. पारडी जि. चंद्रपूर) याचे प्रेत मिळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दीड महिन्यांपासून खान ट्रान्सपोर्ट आदिलाबाद यांच्या कंपनीमध्ये रितेश भोयर हा ट्रक चालक म्हणून कार्यरत होता. १६ जुलै रोजी रितेश भोयर हा ट्रकद्वारे सिमेंट घेऊन दुसऱ्या दिवशी पोहचला होता. पावसामुळे ट्रक खाली न झाल्याने दोन दिवस भंडारा त्याचा मुक्काम राहीला. जुलै २२ रोजी सकाळी त्याचा सिमेंटने भरलेला ट्रक खाली झाल्याने तो भंडारा येथून चिमुर मार्गे मुकुटबनकडे परत निघला होता.

दुपारी अडीच्या सुमारास त्याने आईला मोबाईलद्वारे फोन करुन आपण विष पित असल्याची माहिती दिली. याबाबत मृत युवकाचा मित्राने फिर्याद दाखल केली होती. प्रफुल्ल शामराव गेडेकर असे फिर्याद दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता, मृत युवकाच्या तोंडातून पांढऱ्या रंगाचा फेस निघत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालय, चिमुर येथे पाठवला असून घटनेची नोंद घेण्यात आली आहे. मात्र त्यांने आईल सांगून विष प्राशन करून जीवनयात्रा का संपविली या उलगडा झालेला नाही.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news