देहूरोड : अंधाराने घेतला बळी, रस्ता ओलांडताना झाला अपघात | पुढारी

देहूरोड : अंधाराने घेतला बळी, रस्ता ओलांडताना झाला अपघात

देहूरोड : पुणे-बंगळूर महामार्गावर शितळानगर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्यासमोर एकाला भरधाव मोटारीने उडविले.अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.

सचिन सिद्धार्थ आगळे (वय 45, रा. दारूंबरे, ता. मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. रात्री वीज नसल्यामुळे सचिन अंधारातून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुणे बाजूने भरधाव आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ढमाळ करीत आहेत.

Back to top button