संबित पात्रा म्‍हणाले, राणेंना अटक हा तर लोकशाहीवरील हल्‍ला | पुढारी

संबित पात्रा म्‍हणाले, राणेंना अटक हा तर लोकशाहीवरील हल्‍ला

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक हा लोकशाहीवरील हल्‍ला आहे. महाराष्‍ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारचे धोरण दुटप्‍पी आहे. याबाबत राज्य सरकारला जनतेला उत्तर द्‍यावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्‍ते संबित पात्रा आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पात्रा म्‍हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांच्‍याविरोधात केलेले विधान चुकीचे असेल. मात्र त्‍यांच्‍याविरोधात झालेली कारवाई ही अत्‍यंत चुकीची आहे. महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍यावर कोट्यवधी रुपयांच्‍या भ्रष्‍टाचाराचा आरोप आहे. ते मोकाट फिरत आहेत.  नारायण राणे यांना झालेली अटक ही महाराष्‍ट्र सरकार राजकीय सूडापोटी केलेली कारवाई आहे, असा आरोपही पात्रा यांनी केली.

नारायण राणे यांना झालेली अटक ही अत्‍यंत गंभीर प्रकरण आहे. ही लोकशाहीची हत्‍या आहे. नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांच्‍याविरोधात केलेले विधान चुकीचे आहे. त्‍यांना हे शब्‍दप्रयोग टाळणे शक्‍य होते. तरीही अशा पद्‍धती राज्‍य सरकारने कायदाचा दुरुपयोग करत केलेली कारवाई चुकीची आहे, असेही पात्रा म्‍हणाले.

महाराष्‍ट्रातील मंत्री हे कायदा हाच सर्वोच्‍च असल्‍याचा दावा करत आहेत; मग भाजपच्‍या कार्यालयावर दगडफेक, नागरिकांच्‍या जीवाला धोका निर्माण होईल, असे कृत्‍य हे कायदेशीर आहे का, एका केंद्रीय मंत्रीपदावर असणार्‍या व्‍यक्‍तीविरोधात ३० ते ४० कलमांन्‍वये गुन्‍हा दाखल केला जातो हा कायदा आहे का, असा सवालही त्‍यांनी केला.

महाराष्‍ट्रात विविध खात्‍याचे २७ मंत्र्यांवर विविध गुन्‍ह्यांन्‍वये खटले सुरु आहेत. यातील किती मंत्री हे कारागृहात आहेत, असा सवालही संबित पात्रा यांनी या वेळी केला.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ :मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

 

Back to top button