राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही पण राणे यांच्या मागे खंबीर; देवेंद्र फडणवीस | पुढारी

राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही पण राणे यांच्या मागे खंबीर; देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्याबाबत बोलले असतील. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, नारायण राणे यांच्या मागे भाजप खंबीरपणे उभा असेल, अशी माहिती विराोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.

फडणवीस म्हणाले, ‘नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे वाद उभा राहिला आहे. बोलण्याच्या भरात कदाचित ते वाक्य बोलले असतील. तसे वाक्य वापरल्याचे त्यांच्या मनात असेल असे वाटत नाही.

तथापि मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्या पदाबद्दल, व्यक्तीबद्दल बोतलाना संयम बाळगणे आवश्यक आहे.

वस्तुत: स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्व विसरता हे कुणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो. परंतु तो वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाऊ शकला असता.’

कुणी वासरू मारले म्हणून तुम्ही गाय मारणार का?

त्यांच्यावर सरकार ज्या प्रकारे कारवाई करत आहे. त्याचे बिल्कुल समर्थन करू शकत नाही. एखाद्याने वासरू मारले तर कुणी गाय मरू नये.

भारतीय जनता पक्ष हा राणेसाहेबांच्या त्या वक्तव्याच्य पाठीशी नसेल. पण राणे यांच्यामागे पूर्णपणे उभा राहील.

राणे यांच्यावर जी कारवाई करण्यात आलीय आहे ती सूडबुद्धीने केलीय.

शर्जिल उस्मानी महाराष्‌ट्रात येतो, हिंदुंना खुनी म्हणतो त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि इकडे मात्र अख्खी पोलिस फोर्स राणे यांना पकडण्यासाठी लावली आहे.

पोलिस आयुक्तांनी जे पत्र काढले आहे ते पाहता हे स्वत:ला छत्रपती समजतात का? असा संशय येतो.

त्यांच्या मुसक्या बांधा, मुसक्या आवळा असे आदेश कसे देता?

पोलिसांना बसा म्हटले की लोटांगण घालतात

राणे यांना अटक करण्याआधी त्यांची जबानी घ्यावी लागेल, त्यानंतरच तुम्ही कारवाई करू शकता. पोलिसांचा गैरवापर सुरू आहे.

महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांची क्षमता मला माहीत आहे. संपूर्ण देशात निष्पक्ष पोलिस दल अशी ख्याती आहे.

मात्र, आता सरकारने बस म्हटले की काहीजण लोटांगण घालतात.

केवळ सरकारला खूश करण्यासाठी कारवाई सुरू असेल तर महाराष्ट्राची प्रतिमा राहणार नाही.

आधीच वसुली कांडांमुळे प्रामाणिक पोलिसांकडे पाहण्याची नजर बदलली आहे.

पोलिसांचा वापर सरकार करत आहे. हे पोलिसजीवी सरकार झाले आहे. प्रत्यके वेळी उच्च न्यायालयातून चपराक पडत आहे.

अर्णव गोस्मावी, कंगना राणावत प्रकरणातही सरकार तोंडघशी पडले आहे. आपला बदला घेण्याचे प्रकार चुकीचे आहे.

कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलिस कुठे आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाही.

आमच्या कार्यालयांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करू. हे तालिबान नाही.

हेही वाचा: 

Back to top button