'आय 2 यू 2' शिखर संमेलनास पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन | पुढारी

'आय 2 यू 2' शिखर संमेलनास पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारत, इस्राईल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका या देशांनी एकत्र येऊन बनविलेल्या ‘आय 2 यू 2’ संघटनेचे पहिले शिखर संमेलन येत्या 14 तारखेला पार पडणार आहे. या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन, इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती मो. बिन जायद अल नाह्यान हेही संमेलनात आभासी मार्गाने मार्गदर्शन करणार आहेत. ‘आय 2 यू 2’ मधील आयचा अर्थ भारत आणि इस्राईल असा असून यू चा अर्थ अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात असा आहे. ‘आय 2 यू 2’ संमेलनात संरक्षण संकट तसेच घटक देशांदरम्यानचे सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button