

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : फेसबुक हा सोशल मीडियामधील सर्वात मोठा प्लॅटफाॅर्म समजला जातो आहे. त्यावर युजर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. आता फेसबुकने छोटे आणि मध्यम उद्योजकांना कर्ज वाटप करणार आहे. Small Business Loans initiative (MSME) असं या कर्ज योजनेचं नाव आहे.
हे कर्ज देशातील २०० शहरांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी फेसबुकने Indifi शी करार केला आहे. या कंपनीतर्फे MSME कर्जवाटप करते. फेसबुक इंडियाचे व्हीपी आणि एमडी अजित मोहन यांनी ही कर्ज वाटपाची योजना लाॅंच केली आहे. हे कर्ज ५ दिवसांत मंजूर केले जाईल.
या कर्जाचा व्याजदरही १७-२० टक्के असणार आहे. महिला व्यवसायिकांसाठी ०.२ टक्के दिली जाणार आहे. तसेच कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नाही. लोनसाठी व्यवसायिकांना सहज कर्ज मिळावे, अशी सोय फेसबुकने केलेली आहे. अजित मोहन म्हणाले की, "ही योजन सुरू करण्यामागचं उद्दिष्ट बिझनेस लोन सहन मिळवून देणे, हे आहे. फेसबुकने भारतातच पहिला योजना आणली आहे."
फिक्की (FICCI) चे अध्यक्ष उदय शंकर म्हणाले की, "फेसबुकने सुरू केलेली ही कर्ज मोहीम कौतुकास पात्र आहे. MSME सेक्टरला पुढे नेण्यासाठी मदत मिळेल. ज्या कंपन्या काही तारण ठेवू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुकचे हे कर्ज उपयोगाचे आहे."
नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, "MSME हा देशाचा विकासाचा कणा आहे. फेसबुकची ही मोहीम विकासालच्या मदतीसाठी मोठं पाऊल आहे." अजित मोहन म्हणाले की, "फेसबुकला या योजनेतून काहीही फायदा नाही. कारण, त्यांनी Indifi सोबत करार केलेले आहे. त्यांचा व्यवसाय करण्याचा कोणताही उद्देश नाही."
पहा व्हिडीओ : कोल्हापूरच्या तरुणाने केला मधमाशीपालनाचा यशस्वी उद्योग