हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली त्यांनी धोका दिला : सुधीर मुनगंटीवार | पुढारी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली त्यांनी धोका दिला : सुधीर मुनगंटीवार

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली त्यांनी धोका दिला, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार विधानसभा सभागृहात गरजले. लढाईत थांबायचं कुणाला कळतं तो योध्दा, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदनही केले. तसेच विश्वास दाखवणाऱ्यांचे आभारही मानले. दोघांनाही यश लाभे, अशी सर्व देव-देवतांना प्रार्थनाही त्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चांदा ते बांद्याने अडीच वर्षांपूर्वी युतीला कौल दिला. पण, २४ ऑक्टोबरचा तो अशुभ दिवस उजाडला. २३ नोव्हेंबरला अजित दादांनी जे केलं, ते आता झालंय. विरोधकांमधील अर्धे लोक मध्यरात्री आम्हाला भेटतात. कोण, कधी इथं येईल, याचा अंदाज नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

बहुमताने सरकार आलं आणि तुम्ही रडण्याचा कार्यक्रम सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेवर टीका केली. शार्जिलवर कारवाई नाही, पण हनुमान चालिसा वाचणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांनाच का दंड करण्यात आला? ज्यांना फक्त खुर्ची माहित आहे, त्यांना त्याग काय कळणार? कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेचं मिरवायचे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केला.

बाळासाहेब म्हणाले होते, आम्ही काँग्रेसोबत जाणार नाही. बाळासाहेबांचं वचन कुणी मोडंल, हे सर्वांनाच माहिती आहे. भगव्याचा अर्थ लोकांना समजलाच नाही. एकनाथ शिंदेंना माझा सॅल्यूट आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Back to top button