सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील शार्प शूटरला अटक | पुढारी

सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील शार्प शूटरला अटक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
प्रसिध्द पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सामील असलेला शार्प शूटर अंकित सेरसा तसेच त्याच्या सचिन नावाच्या साथीदाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. काश्मीरी गेट परिसरात रविवारी मध्यरात्री या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

अंकित सेरसा हा हत्याकांडातील प्रियव्रत उर्फ फौजी मॉड्युलचा सदस्य आहे. तो मूळचा हरियाणातील सेरसा गावचा रहिवासी असून लॉरेन्स बिष्णोई – गोल्डी बराड़ टोळीशी संबंधित आहे. अंकितविरोधात राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे याआधीच दाखल आहेत. अंकित व सचिन यांच्याकडे पंजाब पोलिसांचे तीन ड्रेस, 9 एमएमचे एक पिस्तुल, पॉईंट तीन एमएमचे एक पिस्तुल, मोबाईल, डोंगल आदी ऐवज सापडला असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून सांगण्यात आले.

मुसेवाला हत्याकांडातील मुख्य शूटर प्रियव्रत याच्यासोबत अंकित सेरसा बोलेरोमध्ये बसला होता. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके नावाच्या गावात झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button