भाजपनं राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते?; भास्कर जाधव विधानसभेत गरजले | पुढारी

भाजपनं राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते?; भास्कर जाधव विधानसभेत गरजले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी अक्षरश: आठ दिवस झोपलेलो नाही. मी अस्वस्थ आहे, विचलीत आहे. पण हे मी सांगू शकत नाही. पण माझ्या अस्वस्थ चेहरा लपवूही शकत नाही, असे आपले मनोगत व्यक्त करत असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महाराष्ट्रात  राजकीय सत्तासंघर्षाबाबत नाराजी व्यक्त केली. ते अक्षरक्ष: आज विधानसभेत गरजले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार. मला माहीत आहे माझं बोलणं ऐकूण घेणार नाही. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं म्हणणं ऐकून घेण्याचे औदार्य दाखवावे असे म्हणत भास्कर जाधव यांनी फडणवीसांना टोला मारला. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जेव्हा ८० तास सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे, मी विरोधी पक्षाचा एक सदस्य आहे,  माझ बोलणं काही असंवैधिनाक नसणार आहे.  माझे बोलणे ऐकून घ्यावे” असे म्हणतं जाधव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत.  शिंदे माझ्याशी कधीही बोलत नव्हते. शिंदे जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावणारे नेते. तुम्ही जरी माझ्याशी बोलत नसलात तरीही आपली काम करण्याची पद्धत मला भावली. तुम्ही केलेली कोकणात केलेले काम भावली, असे म्हणतं त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.

शिंदेंचे कौतुक करत असताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे आजही शिवसैनिक म्हणवतात आणि तेह खरेही आहे. पण  एका बाजूला फुटलेले ४० आमदार आणि एकीकडे शिवसैनिक कोण कोणाला भारी पडणार हे माहीत नाही. पण  महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार. आता पानिपतच्या युध्दात जे घडले ते आता महाराष्ट्रात घडणार. एकनाथ शिंदे हे तुम्ही दिल्लीचे पातशाह आहात, असेही म्हटले.

कोरोना काळात सर्व पक्षांनी मिळून काम करणे गरजेचे होते. पण विरोधी पक्षातील लोक हे सरकार कसे पडेल यावर भर देत होते. सत्ता घालवण्यासाठी वाट्टेल ते केले. महाराष्ट्रात सरकार पडेल यावर भर देत होते. कुणाच्या हातात भोंगा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा होती. सुशांतसिंह ते नुपुर सिंह पर्यंत मुद्दे उकरुन काढले. संजय राठोड यांच पद घालवण्यासाठी आंदोलन केले. ते आज तुमच्या शेजारी आहेत. यामिनी जाधव यांना चौकशी लावली आज त्यांनाच सुरक्षा दिली आहे. सगळ्या मराठी माणसावर ईडी लावली, असा आरोप त्यांनी केला.

Back to top button