

पुढारी ऑनलाईन डेस्क :
पावसाबाबत हवामान विभागाने एक आनंदवार्ता दिली आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राजस्थानमधील अजमेर, सीकर, चुरु आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये दोन तासात ३.२ इंच पाऊस झाला. संपूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा एक दिवसात झाला. अजमेरमध्ये ११ वर्षांपूर्वी झालेल्या पावसाचे रेकॉर्डही मोडले.
या वर्षी महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मान्सूनचे उशीरा आगमन झाले. मात्र जुलै महिन्याची सुरुवात दमदार झाली आहे. यामुळे विविध राज्यामंधील शेतकरी सुखावला आहे. तर काही राज्यात मुळधार पावासाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई शहर व उपनगारत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भोपाळला शुक्रवारी मुसळधार पावसाने झोपडले. दोन तासांमध्ये ३.२ इंच पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी नर्मदापुरममध्ये ५.५ इंच, देवास, सीहोर आणि ४.५-४.५ इंच, उज्जैन, अशोकनगर, मंदमौर ३.३ इंच पाऊस झाला. नर्मदापुरममध्ये तवा धरणात ३० तासांमध्ये ५ फूट पानी वाढले आहे.
राजस्थानमधील अजमेर येथे ११ वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड मोडला. आठ दिवस राज्यात उशीरा दाखल झालेल्या पावसाने अजमेर, राजगढ, झुंझुनूं, सीकर शहराला झोडपले. अजमेर शहरातील सखल भागात पानी साचल्याने नागरिकांचीतारांबळ उडाली. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर बिहारला मुसळधार पावसाने झोडपले. मागील तीन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने महिन्याचा कोटा पूर्ण केले आहे. केवळ ७२ तासांमध्ये पूरस्थिती बनली आहे. बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोतास, भभुआ, औरंगाबाद, अरवल, पश्चिम चंपारण, सीवान, सारण, पूर्वी चंपारण आणि गोपालगंज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मागील तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे.
गुजरातच्या सौराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर मान्सूनने दक्षिण गुजरातमध्ये हजेरी लावली. शुक्रवारी सूरतला मुसळधार पावसाने झोडपले. २० तासांमध्ये तब्बल आठ इंच पाउस झाल्याने रस्त्यांना नाल्याचे रुप आले.
हेही वाचा :