eknath shinde : भाजपनं एकनाथ शिंदेंनाच का केलं मुख्यमंत्री?; जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे मत (video) | पुढारी

eknath shinde : भाजपनं एकनाथ शिंदेंनाच का केलं मुख्यमंत्री?; जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे मत (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितल्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीना दिला. यानंतर राज्यपालांनी विरोधी पक्षाला संख्याबळ असल्याने मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश दिले. यानंतर देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार हे चित्र स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीसांनी सुत्रे हातात घेतली खरी पण  पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची अचानक घोषणा केली. फडणवीस यांच्या या निर्णयाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपने एकनाथ शिंदेंनाच का मुख्यमंत्री केले याबद्दल जनमनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नवार जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचे मत…

या प्रश्नावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे म्हणतात, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव हे काही अचानक आलेले नाही. राष्ट्रीय राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याची भाजपची जी व्यापक रणनिती आहे, हा याचाच एक भाग आहे. भाजपने आखलेल्या नितीचा हा एक टप्पा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय राजकारणामध्ये भाजपने जे काही नवीन ट्रेंड आणले आहेत, ते समजण्यासाठी कोणी जाणकार, थिंक टँक हा विरोधी पार्टीकडे नाही. बौद्धिक पातळीवर विचारमंथन इतर पक्षाकडे नाही. भाजप खेळत असलेल्या डावपेचाचा अंदाज लावण्यासाठी भारतील सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात जी परिस्थिती दिसत आहे, ही भाजपच्या पूर्वीच ठरलेल्या रणनितीचे पडसाद आहेत. यासाठी एकनाथ शिंदेंचे नाव हे भाजपने आधीच ठरवलेले होते. भाजपने एकनाथ शिंदेंच्या नावाची खेळी खेळून शिवसेनेपुढे बलाढ्य आव्हान निर्माण केले आहे. स्वकीयांकडूनच शिवसेनेवर हल्ला हा भाजपचा डाव आहे. शिवसेना नेमकी कोणाची? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या गटाकडे वळत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमची असा दावा केल्यास, ते अधिक वरचढ ठरतील. शिवसेनेला संपविण्यासाठी एका भाजपला एका शिवसैनिकाचीच गरज होती. एकनाथ शिंदेंच्या मदतीनेच शिवसेना संपवायची अशी भाजपची भूमिका असल्याचे ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशचा विचार केल्यास येथे मायावतींची मते फोडून आपली बाजू भक्कम करणे हेच भाजपचे लक्ष होते. या ठिकाणी भाजपने फक्त मायावतींची वोटबँक, त्याच्या संबंधित असलेले गैरव्यवहार फोकस केले होते. त्यांनी मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. या निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले. ही उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातदेखील भाजपच्या विरोधी पक्षाने सावध राहणे गरजेचे होते. यासोबतच महारष्ट्रातही सत्ताधारी शिवसेना पक्षाने सावधानता बाळगणे गरजेचे होते.

पहा व्हिडिओ: 

 

 

Back to top button