जालना: १२ हजार वाहने आऊटडेटेड!; 1884 वाहनांची पुनर्नोंदणी, 9 हजार 117 वाहने प्रतीक्षेत | पुढारी

जालना: १२ हजार वाहने आऊटडेटेड!; 1884 वाहनांची पुनर्नोंदणी, 9 हजार 117 वाहने प्रतीक्षेत

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात 12 हजार 148 वाहने आउटडेटेड झाली असून त्यापैकी 1 हजार 884 वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात आली आहे. तर 9 हजार 117 वाहनांच्या मालकांनी अद्यापही पुनर्नोंदणी केलेली नाही. चालू वर्षात या सर्व वाहनांची फिटनेस चाचणी करून घ्यावी लागणार आहे. फिटनेस चाचणी न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

प्रत्येक वाहनांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून ती सरासरी पंधरा वर्षे ठरली आहे. जिल्ह्यात 2007 मध्ये 12 हजार 148 वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. आता त्या वाहनांची वयोमर्यादा संपलेली आहे. आता वयोमर्यादा संपलेल्या वाहनांची फिटनेस चाचणी करुन ती वाहने पुनर्नोंदणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने 4 ऑक्टोबर 2021 ला या शुल्कवाढीसंदर्भात परिपत्रक काढले होते.वाढीव शुल्क हे 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्याबाबतचे त्याच परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. त्यामुळेच जालना आरटीओत ही वाढीव शुल्क आकारले जाण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये पंधरा वर्षांची वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस व रजिस्ट्रेशन या शिर्षामध्ये वाढ झाली आहे.

वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. त्यामुळे वाढीव शुल्काचा आणि जुन्या शुल्काचा विचार केल्यास झालेली शुल्कवाढ ही 3 पटीपासून ते 17.5 पटीपर्यंत झालेली आहे. या शुल्क वाढीचा वाहन मालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक 17.5 पट शुल्क वाढ ट्रक व बसमध्ये झालेली आहे.

नव्या नियमाने शुल्क आकारणी

फिटनेस व री-रजिस्ट्रेशन’ शुल्कवाढी संदर्भातील परिपत्रक ऑक्टोबर 2021 मध्येच आले आहेत. त्यानुसार 1 एप्रिलपासून शुल्कवाढ करण्यात आली. ऑनलाइन सिस्टिममध्ये बदल झाले आहेत.

ट्रान्सपोर्ट                        जुने                             नवे

(बस /ट्रक)                      800                       14000
एलएमव्ही                      600                          8500
मोटारसायकल                300                          1000
प्रवाशी ऑटोरिक्षा            300                           2500
कार                              600                           5000

दररोज 50 रुपयांप्रमाणे अतिरिक्त दंड

बस किंवा ट्रकची (ट्रान्सपोर्ट) वयोमर्यादा संपल्यानंतर आरटीओमध्ये फिटनेस प्रमाणपत्रासाठी वाहन न नेल्यास ट्रान्सपोर्ट शिर्षाखालील मोठ्या वाहनांना प्रती दिवस 50 रुपये दंड लावण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड केवळ दोनशे रुपये होता. त्यामध्ये वाहन कितीही उशिरा नेले तरीही दंड मात्र 200 रुपयेच रहायचा. तसेच कार वर्ग वारीतील वाहन फिटनेसची मुदत संपल्यानंतर उशिरा नेल्यास प्रति महिना 500 रुपये व दुचाकी प्रति महिना 300 रुपये दंड आकारण्याची तरतूद नव्या नियमात केलेली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button