PM Modi : पंतप्रधान मोदींनी केली पीएसएलव्ही सी- ५३ मोहिमेची स्तुती | पुढारी

PM Modi : पंतप्रधान मोदींनी केली पीएसएलव्ही सी- ५३ मोहिमेची स्तुती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातंर्गत दोन स्टार्टअप्सकडून अंतराळात अलिकडेच दोन पे- लोड पाठविण्यात आले होते. यासंदर्भातील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पीएसएलव्ही सी – 53 मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्तुती केली आहे. आगामी काळात आणखी काही कंपन्या अंतराळात पोहोचतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.

इस्रोची एका आठवड्याच्या आतील दुसरी मोहीम यशस्वी झाली आहे. श्रीहरिकोटा येथून इस्रोने पीएसएलव्ही सी -53 च्या माध्यमातून तीन उपग्रह गुरुवारी अंतराळात पाठविले होते. पीएसएलव्ही सी -53 मोहिमेने भारतीय स्टार्टअप्सचे दोन पे-लोड प्रक्षेपित करण्यात यश मिळवले आहे. या साहसिक कार्यासाठी इन-स्पेसई तसेच इस्रोचे आपण अभिनंदन करतो, असे मोदी (PM Modi)  यांनी म्हटले आहे. दिगंतरा आणि ध्रुव स्पेस नावाच्या दोन भारतीय स्टार्टअप्सचे पे-लोड इस्रोने अंतराळात पाठविलेले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button