कोंकणा सेनचा ‘मुंबई डायरीज 26/11’ यादिवशी भेटीला | पुढारी

कोंकणा सेनचा ‘मुंबई डायरीज 26/11’ यादिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन : कोंकणा सेनचा ‘मुंबई डायरीज 26/11’ कुठल्या दिवशी रिलीज होणार याविषयीची तारीख समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांच्या आगामी ‘मुंबई डायरीज् 26/11’ या सीरिजच्या प्रीमिअरची घोषणा केली आहे.

9 सप्टेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या काल्पनिक मेडिकल ड्रामा सीरिजचे दिग्दर्शन निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्वेस यांनी केले आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिक्स आणि हॉस्पिटल्सच्या कर्मचार्‍यांची कहाणी आहे. कोंकणा सेन, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

Back to top button