Agneepath Scheme : ‘अग्‍निपथ योजना रद्द होणार नाही, तिन्‍ही दलांकडून भरतीच्‍या तारखा जाहीर’ | पुढारी

Agneepath Scheme : 'अग्‍निपथ योजना रद्द होणार नाही, तिन्‍ही दलांकडून भरतीच्‍या तारखा जाहीर'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील विविध राज्‍यांमध्‍ये अग्‍निपथ भरती योजनेला Agneepath Scheme तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर लष्‍कराच्‍या तिन्‍ही दलांच्‍या प्रुमखांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्‍यांनी अग्‍निपथ योजना रद्द होणार नाही, असे स्‍पष्‍ट करत तिन्‍ही दलांमध्‍ये हाेणार्‍या भरतीच्‍या तारखाही जाहीर केल्‍या.  त्‍यानुसार, आता  हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून, नौदलाची २५ जून तर भुदलाची १ जुलैपासून सुरु होईल, असे यावेळी स्‍पष्‍ट करण्‍यात आले.  तसेच हिंसाचार प्रकरणी गुन्‍हा दाखल झालेल्‍या तरुणांना या भरती प्रक्रियेत संधी मिळणार नाही, असेही यावेळी स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

अग्‍निवीरांना लष्‍करातील जवानांनुसार सर्व सोयीसुविधा मिळणार

यावेळी लेफ्‍टनंट जनरल अनिल पुरी म्‍हणाले की, अग्‍निपथ भरती  Agneepath Scheme योजनाही अत्‍यंत विचारपूर्वक तयार करण्‍यात आली आहे. गेली दोन वर्ष यावर विचार सुरु होता. या योजनेचा उद्‍देश हा तरुणांमध्‍ये उत्‍साह आणि जागृती निर्माण करण्‍याचा आहे. ही योजना देशातील युवकांसाठी अत्‍यंत फायदेशीर आहे. सर्व अग्‍निवीरांना लष्‍करातील जवानांनुसार सर्व सोयीसुविधा असणार आहेत. ही योजना देशातील युवकांच्‍या भवितव्‍याचा विचार करुनच तयार करण्‍यात आली आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
हिंसाचार प्रकरणी गुन्‍हा दाखल असल्‍याचे भरतीची संधी नाही.

अग्‍निपथ भरती योजनेविरोधात देशातील काही राज्‍यांमध्‍ये विरोध सुरु आहे. तसेच काही ठिकाणी आंदोलनास हिंसक वळणही लागले. हिंसाचारात रेल्‍वेसह सरकारी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंसाचार प्रकरणी ज्‍या युवकांवर गुन्‍हा दाखल झाले आहेत त्‍यांना भरतीची संधी दिली जाणार नाही, असेही या पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

Agneepath Scheme : शहीद अग्‍निवीरांच्‍या नातेवाईकांना मिळणार एक कोटी रुपयांची मदत

देशासाठी बलिदान देणार्‍या अग्‍निवीरांच्‍या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. तसेच सियाचीन व अन्‍यक्षेत्रात तैनात असणार्‍या नियमित जवानांप्रमाणेच अग्‍निवीरांनाही सर्व भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. नियमित जवानांना मिळणणार्‍या सर्व सुविधा त्‍यांनाही दिल्‍या जाणार आहेत, असेही यावेळी अनिल पुरी यांनी सांगितले.

२४ जून रोजी हवाई दल भरती

या वेळी एअर मार्शल एस के झा यांनी सांगितले की, अग्‍निपथ भरती योजनेतंर्गत २४ जून रोजी हवाई दलाची भरती प्रक्रिया सुरु होईल. ही सर्व प्रकिृया ऑनलाईन पद्‍धतीने होणार आहे. यानंतर नोंदणी सुरु झाली. यानंतर एक महिन्‍यांनी २४ जुलै रोजी पहिल्‍या टप्‍प्‍यातील ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. तसेच ३० डिसेंबरच्‍या पूर्वीच पहिल्‍या तुकडीचे प्रशिक्षही सुरु होइैरू, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

यावेळी नौदलाचे व्‍हाईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी म्‍हणाले की, नौदलाची भरती प्रक्रिया २५ जून रोजी सुरु होईल. याची जाहीरात माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून केली जाईल. यानंतर एक महिन्‍याने भरती प्रकिृया सुरु होईल. २१ नोव्‍हेंबर २०२२ रोजी आमचे पहिले अग्‍निवीर प्रशिक्षण संस्‍थेत रिपोर्ट करतील.

हेही वाचलंत का ? 

Back to top button