

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,899 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला. देशातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या 72,474 वर पोहोचली आहे. शनिवारपेक्षा (दि. 18) रविवारची (दि. 19) रुग्णसंख्या 317 (2.4 टक्के)ने कमी झाली आहे. शनिवारी 13,216 रुग्ण आढळले होते.