कंगणा राणावत, "मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी..." | पुढारी

कंगणा राणावत, "मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवडची क्वीन कंगणा राणावत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत सोशल मीडिया आणि बातम्यामधून झळकत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. बऱ्याच वेळेला तिला त्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या तालिबानी कृत्यांवर तिने फेसबुकवरून पोस्ट करून कंगणाने चर्चेला आणखीच फोडणी दिलेली आहे.

कंगणाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. इतकंच नाही तर, त्यातं मोठं विधानही केलं आहे की, “हा अफगाणिस्तानातील व्हिडीओ पहा आणि लक्षात घ्या. पाकिस्तान तालिबान्यांचे भरणपोषण करतो, तर अमेरिका त्यांना शस्त्रं पुरवतो. जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर भारतीचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानासारखीच झाली असती”, असं विधान कंगणा राणावत हिने करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

तिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात काॅमेंट्स, लाईक्स आणि शेअर आलेले आहेत. तसेच एक मोठी चर्चा छेडली गेली आहे. त्याचबरोबर कंगणाने अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या आक्रमणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये कंगणा म्हणते की, “हे चित्र आहे आजचे अफगाणीस्तानमधील राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान घरातील. फार वर्षांपूर्वी भारतमाता या भटक्या आणि रानटी मुस्लिमांच्या कचाट्यात कशी सापडली असेल, याची स्पष्ट कल्पना या व्हिडीओमधून स्पष्ट कल्पना येते”, असंही विधान कंगणाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलं आहे.

Back to top button