सेकंड हँड मर्सिर्डिज ‘अशी’ घ्या! कंपनीनेच सुरू केली सुविधा | पुढारी

सेकंड हँड मर्सिर्डिज ‘अशी’ घ्या! कंपनीनेच सुरू केली सुविधा

मुंबई, पुढारी ऑनलाईन : लक्झरी कारमध्ये मर्सिडिज या कारने स्वतःच असं खास स्थान निर्माण केलेलं आहे. श्रीमंती थाट म्हणजे मर्सिडिज असं समीकरणच जुळलेलं आहे. काहींना जुनी सेकंड हँड मर्सिडिज घ्यायची असते, पण ती खात्रीशीर कुठे मिळेल याची माहिती नसते.

अशा मर्सिडिज प्रेमींसाठी कंपनीने स्वतंत्र वेबसाईट सुरू केली असून त्यावर सेकंड हँड मर्सिडिज घेता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर सेंकड हँड मर्सिडिज विकत घेता येते. कंपनीने गेल्या आठवड्यात या मार्केटप्लेसची घोषणा केली आहे.

या साईटवर गेल्यानंतर ठिकाण, किंमत, रनिंग, इंजिनचा प्रकार, किंमत, कलर असे विविध प्रकारात कार शोधता येते. सध्या या साईटवर उपलब्ध कार कमी आहेत, पण त्यांची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे ज्यांना सेकंड हंँड मर्सिडिज घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ही साईट उपुयक्त ठरणार आहे. 

मर्सिडिजकंपनीला Used Cars चा बिझनेस ५० टक्केंनी वाढवायचा असून त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीचे भारताचे CEO मार्टिन श्वेन्क यांनी म्हटलं आहे की,

“जवळपास ४ हजार सेकंड हँड कार या मार्केटप्लेसवर उपलब्ध होतील, अशी आशा कंपनीला आहे.

सध्या Used कारचा व्यवसाय हा संघटित स्वरुपाचा नाही. या मार्केट प्लेसमुळे ज्यांना कार विकायची आहे, असे लोक आणि घेण्यासाठी इच्छुक असलेले यांच्यात थेट संपर्क होईल, आणि पारदर्शक व्यवहार होतील. शिवाय इतर सेवाही देता येणार आहेत”, असंही ते म्हणाले.

“या व्यवहारात कंपनीला कोणताही थेट लाभ होणार नाही, पण सेंकड हँडमध्ये जर एक कार विकली गेली, तर आमची १ नवी कारही विकली जाईल, याची आम्हाला खात्री आहे”, असे ते म्हणाले.

पारदर्शक व्यवहार

पारदर्शक व्यवहार, कार खरेदीसाठी अधिक पर्याय, डिलरशिपच्या सुविधा अशा सेवा या साईटमुळे देता येणार आहेत. कोरोनाचा सेकंड हँड कारच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेनंतर आता स्थिती पूर्ववत होत आहे”, असं मार्टिन श्वेन्क म्हणाले.

कोरोनामुळे लोक जुन्या कार विकणार नाहीत असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नकारात्मक दिलं आहे. २०२१ हे वर्षं चांगलं जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. मर्सिडिजने नव्या कारच्या विक्रीतही बदल केला आहे. कंपनी थेट कार ग्राहकांनी विकणार आहे, तर डिलरशिपमधून ब्रँड एक्सप्रियन्स, सेल्ससल्ला, टेस्ट ड्राईव्ह अशा सुविधा मिळणार आहेत.

हे वाचलं का?

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरकरांनी जपलीय  स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button