प्रयागराज हिंसाचार : ‘मास्‍टर माइंड’च्‍या घरावर प्रशासनाने चालवला ‘बुलडोझर’ | पुढारी

प्रयागराज हिंसाचार : 'मास्‍टर माइंड'च्‍या घरावर प्रशासनाने चालवला 'बुलडोझर'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भाजपच्‍या तत्‍कालिन प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानाचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्‍येही उमटले होते. या हिंसाचाराचा मास्‍टर माइंड जावेद उर्फ पंप याचे अवैध घर आज प्रशासनाने जमीनदोस्‍त केले. गौसनगरमधील जावेदच्‍या आलीशान घरावर बुलडोझर चालवण्‍यापूर्वी सामान हलविण्‍याची परवानगी देण्‍यात आली. यानंतर दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनंतर ही कारवाई सुरु झाली. तब्‍बल साडेतीन तासांहून अधिक वेळ ही कारवाई सुरु होती.

तब्‍बल १० हजार पोलिसांचा बंदोबस्‍त

जावेदच्‍या घरावर बुलडोझर फिरविण्‍यापूर्वी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात केला होता. यावेळी पोलिसांना त्‍याच्‍या घरात काही झेंडे मिळाले. परिसरात तब्‍बल १० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात आले होते. प्रयागराज हिंसा प्रकरणी शनिवारी हिंसाचाराचा मास्‍टरमांइड मो. जावेद उर्फ जावेद पंप याला अटक केली होती. आता मुराबादमध्‍येही प्रशासनाने हिंसाचार करणार्‍याविरोधातही बुलडोजर कारवाई सुरु करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button