अतिक्रमण विरोधी कारवाई नंतर तुटलेल्या दुकाना पुढे खरेदीसाठी वाकडकरांची रिघ | पुढारी

अतिक्रमण विरोधी कारवाई नंतर तुटलेल्या दुकाना पुढे खरेदीसाठी वाकडकरांची रिघ

वाकड प्रतिनिधी : अतिक्रमण विरोधी कारवाई नंतर तुटलेल्या दुकानापुढे खरेदीसाठी वाकडकरांची ची रिघ मागील दोन दिवसापासून वाकड मध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाई नंतर रस्त्यावर असणाऱ्या फॉम फर्निशिंग सोफासेट इंटिरियर दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे नागरिकांची मात्र लॉटरी लागली आहे .

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जगताप डेरी ते हिंजवडी जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने जमीनदोस्त केली असून त्या दुकानांमध्ये असणारे साहित्य तसेच पडून राहिल्यामुळे दुकानदारांनी तो कमी दरामध्ये विक्रीस काढला आहे, आज रविवार असल्यामुळे सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून वाकडकरांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

बारा हजार रुपये किमतीला असणारी खुर्ची चार हजार रुपये किमतीत मिळत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले होते. तीस हजार रुपये चा सोपा 15 हजारात मिळत होता तसेच गालिचा यांच्या किमतीही निम्म्यावर ते आल्या होत्या. एकंदरीत अतिक्रमणविरोधी कारवाईत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दुकानदारांनी सहित यांची सेल लावून आपले गुंतवलेले भांडवल तरी कमी करण्याचा प्रयत्न केला.

परंतु खाजगी साठी केलेल्या गर्दीमुळे रस्त्यावरती ट्राफिक जाम ची समस्या उद्भवली होती, खरेदीला आलेले नागरिकांच्या गाड्या त्यांनी रस्त्यावरच पार्क केल्यामुळे वाहन चालकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला. जगताप डेरी ते हिंजवडी हायवे पर्यंत मुंबईला जाण्यासाठी एकमेव रस्ता असून या रस्त्यावर कायम रहदारी असते , नागरिकांनी खरेदीला केलेल्या गर्दीमुळे वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागला. महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी केलेल्या कारवाईत 40 ते 50 हजार स्क्वेअर फिट बांधकाम जमीनदोस्त केले होते , त्यामुळे साहित्य खराब होणे पेक्षा कमी नफा मिळवून व गेले पैसे काढण्याचे धोरण दुकानदाराने अवलंब केल्यामुळे ग्राहकांचा फायदा झाला.

Back to top button