

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंड राज्यातील गुमला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या दोन संशयित आरोपींना संतप्त जमावाने पेटवून दिले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला.
बसुआ तालुक्यातील एका गावातील पीडित अल्पवयीय मुलगी व तिचे पालक स्टाँडवर बसची वाट पाहत होते. येथे त्यांच्याच गावातील सुनील उरांव व आशीष उरांव दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. त्याने तिच्या पालकांना मुलीला गावी सोडतो, असे सांगून मोटारसायकल बसवले. सायंकाळी सात वाजता पीडित मुलीचे आई-वडील घरी पोहचले. यावेळी मुलगी घरी आली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिचा शोध घेतला. जवळील गावात ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली.
सुनील उरांव आशीष उरांव या दाेघांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पीडित मुलीने कुटुंबीयांसह ग्रामस्थानां दिली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह गावातील महिला व पुरुष हे संशयित आरोपींना शोधण्यासाठी बाहेर पडले. हे दोघे तरुण जवळील गावात मोटारसायकलवरुन जात असताना आढळून आले. महिला व पुरुषांनी त्यांना रोखले. या दोघांना घेवून ते पीडित तरुणीच्या गावी गेले. यावेळी पीडित मुलीने आरोपींसमोर पुन्हा एकदा घडलेला प्रसंग ग्रामस्थाना सांगितले.
पीडित मुलीने स्वत:वर झालेल्या अत्याचाराची माहिती सांगताच ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी दोन आरोपींना बेदम चोप दिला. यानंतर जमाव बेकाबू झाला. जमावाने दोघा संशयित आरोपींना मोटारसायकलसह पेटवून दिले. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गावातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील आहे, असे सांगत पोलिसांनी याप्रकरणी महिती देण्यास नकार दिला. याप्रकरणाचा तपास सुरु आहे, एवढीच माहिती स्थानिक पोलिस देत आहेत.
हेही वाचा :