Sidhu Moose Wala Murder : ‘सीबीआय’ चौकशी करा : भाजप नेत्याची याचिका दाखल | पुढारी

Sidhu Moose Wala Murder : 'सीबीआय' चौकशी करा : भाजप नेत्याची याचिका दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येचे प्रकरण (Sidhu Moose Wala Murder) आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. भाजप नेते जगजीत सिंह यांनी मुसेवाला हत्येचा तपास सीबीआय मार्फत करण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे.

मुसेवाला (Sidhu Moose Wala Murder) यांची त्यांच्या राहत्या घराजवळ निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्याच्या नेतृत्वावर असलेला जनतेच्या विश्वसासाला पूर्णत: तडा गेला आहे. दिवसाढवळ्या मुसेवाला याची हत्या करण्यात आली. अशात केवळ गुन्हेगारीवर आळा घालण्यातच नाही, तर टोळीयुद्धाच्या धोकाही प्रभावीपणे रोखण्याच्या कर्तव्यात सरकारी यंत्रणा पूर्णपणे विफल ठरली आहे, असा दावा याचिकेतून करीत हत्येचा तपास केंद्रीय एजन्सी मार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकार प्रभावीपणे तपास करणार नाही, असा विश्वास पंजाबमधील नागरिकांना आहे. शिवाय या हत्याकांडात आंतरराष्ट्रीय गुंडासह स्थानिक तसेच आंतरराज्यीय गुन्हेगारांचा सहभाग असून ते देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. अशात एका विशेष राज्य सरकारच्या तपास यंत्रणेकडून यासंबंधीचा तपास अधिकार क्षेत्राबाहेरील ठरेल, असा युक्तीवाद याचिकेतून करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button