राहुल गांधी म्‍हणाले, ट्‍विटरचे धोरण पक्षपाती, केंद्र सरकारच्‍याआदेशाने लाेकशाहीवरच हल्‍ला

राहुल गांधी
राहुल गांधी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्‍यासह काँग्रेसच्‍या अनेक नेत्‍यांची ट्‍विटर अकाउंट लॉक करण्‍यात आली आहेत. या कारवाईविरोधात राहुल गांधी यांनी एक व्‍हिडिओ प्रसिद्‍ध करत टीका केली आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे की, ट्‍विटरचे धोरण पक्षपाती आहे. ही कारवाई म्‍हणजे लोकशाही विरोधातील हल्‍ला आहे. माझे समर्थन करणार्‍या लाखो नागरिकांचा अपमान झाला आहे. दरम्‍यान, काँग्रेसने दावा केला आहे की, पक्षातील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांसह ५ हजार ट्‍विटर अकाउंट लॉक करण्‍यात आली आहेत.

केंद्र सरकारच्‍या आदेशाने अमेरिकेची कंपनी ट्‍विटर राजकीय प्रक्रियेमध्‍ये दखल देत आहे. ट्‍विटरने केलेली कारवाई ही भारतीय लोकशाहीवरच हल्‍ला आहे. एक राजकीय नेता म्‍हणून हा केवळ माझ्‍यावर हल्‍ला नाही तर माझे १९ ते २० दक्षलक्ष फॉलोअर्स यांनाही आपले विचार व्‍यक्‍त करण्‍यापासून रोखण्‍यात आले आहे.

ट्‍विटरने केंद्र सरकारच्‍या कारवाई करुन कंपनी पारदर्शी नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. याचा वापर करणार्‍यांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. राजकीय संघर्षात एका पक्षाची बाजू घेणे ट्‍विटरवर नकारात्‍मक परिणाम करणारे ठरणार आहे. तसेच हे पक्षपाती धोरण राबविणारी कंपनीला राजकीय भूमिका निश्‍चित करण्‍याचा अधिकार आपण देणार आहे का, असा सवालही त्‍यांनी केला आहे.

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा आक्षेप

बलाकारानंतर खून झालेल्‍या अल्‍पवयीन मुलीच्‍या आई-वडिलांची राहुल गांधी भेट घेतली हाेती. या भेटीचा फाेटाे त्‍यांनी आपल्‍या ट्‍विटर अकाउंटवरुन शेअर केला होता. राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने यावर तीव्र आक्षेप घेतला. ट्‍विटरला संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तसेच फेसबुकलाही राहुल गांधींच्‍या इंस्‍टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी केली.

अल्‍पवयीन पीडिताच्‍या पालकांचा फोटो सोशल मीडियावरुन प्रसिद्‍ध केल्‍याने पीडितेची ओळख जाहीर झाली आहे. ही कृती कायदाचा भंग करणारी आहे, असे राष्‍ट्रीय बाल अधिकार संसक्षण आयोगाने फेसबूकला दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.  पीडिताची ओळख जाहीर करणार्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी ही आयोगाने केली होती. यानंतर राहुल गांधी यांच्‍यापाठोपाठ काँग्रेसचेही ट्‍विटर अकाउंट लॉक करण्‍यात आले होते.

हेही वाचलं का ? 

पहा व्‍हिडिओ : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news