नाशिक : अमळनेरहून नाशिकला येणार्या बस प्रवासात चोरट्याने वृद्धेकडील सुमारे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वैशाली विश्वासराव पवार (67, रा. पातोंडा, ता. अमळनेर, जि. जळगाव) या शुक्रवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास बसने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने वैशाली पवार यांच्याकडील दोन लाख 87 हजार 500 रुपयांचे 11 तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चेारून नेले.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, बस, रेल्वे प्रवासात दागिने, मोबाइल आदी वस्तू चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे प्रवासात चोर्या करणार्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.