राहुल गांधींच्‍या ‘ईडी’ चौकशीपूर्वी काँग्रेस आक्रमक, दिल्‍लीत कार्यकर्ते ताब्‍यात | पुढारी

राहुल गांधींच्‍या 'ईडी' चौकशीपूर्वी काँग्रेस आक्रमक, दिल्‍लीत कार्यकर्ते ताब्‍यात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी आज काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांची सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी ) चौकशी करणार आहे. याविरोधात आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून ‘ईडी’ कारवाईविरोधात निदर्शने करण्‍यात येणार आहे. दिल्‍ली पोलिसांनी विरोध प्रदर्शनास परवानगी नाकारली आहे. दरम्‍यान, आज सकाळी दिल्‍लीत मान सिंह रोडवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. त्‍यांनी ईडीविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तत्‍काळ त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे.

राहुल गांधी यांच्‍या नेतृत्‍वाखाली ‘सत्‍याचा संग्राम’ सुरु राहिल : सुरजेवाला

आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेता रणदीप सुरजेवाला म्‍हणाले की, “देशाच्‍या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटश सरकारी काँग्रेस पक्षाचा आवाज दडपू शकली नाही. भाजप सरकारने देशात अघोषित आणीबाणी जाहीर केली आहे. आम्‍ही आज देशभरात शांततामार्गने ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. नॅशनल हेराल्‍ड हा घोटाळा नाही. आम्‍ही भाजप सरकारसारख देश विकलेला नाही.”

‘ईडी’चे अतिरिक्‍त संचालक दर्जाचा अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करणार आहेत . चौकशी काळात त्‍यांना मोबाईल फोन बंद ठेवावा लागणार आहे. तसेच ईडी कार्यालयात राहुल गांधी यांच्‍या व्‍यक्‍तिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही नेत्‍याला जाण्‍याची परवानगी असणार नाही. राहुल गांधी यांच्‍या ईडी चौकशीपूर्वी त्‍यांच्‍या समर्थनात काँग्रेसचे विविध राज्‍यांमधील नेते दिल्‍लीत दाखल झाले आहेत.

 

 

Back to top button