

कोलकाता, पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या ३४ वर्षीय पत्नीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांमध्ये दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
पीडित महिला आजारी असून तिला बोलता येत नसल्याचा गैरफायदा संशयितांनी घेतला. पोलिसांनी सहाही जणांना अटक केली आहे.
शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक, तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन, रहमत अली, महबूल असे दोन आरोपी आहेत.
संबधित महिला रविवारी रात्री महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. ती घऱी एकटी असताना आरोपी घरात शिरले.
त्यांनी महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला पक्षाघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलता येत नाही.
त्यामुळे त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही.'
दुसऱ्या दिवशी पीडितेला त्रास होत असल्याने उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात नेले. त्यावेळी संबधित महिलेने लिहून आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी याबाबत तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
याबाबत भाजपचे आयटीसेल प्रमुख अमित मालविया म्हणाले, 'पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला.
प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय वापर करत आहे.'
भाजपचे आमदार अग्निमित्र पॉल म्हणाले, 'सोमवारी संध्याकाळपर्यंत वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. महिला लेखी स्वरुपात बलात्कार झाल्याचे सांगत होती.
असे असतानाही डॉक्टर वैद्यकीय तपासणी करण्यास तयार नाहीत. ते दबावापोटी बलात्काराच्या जखमा नसल्याचं सांगत होते.'