सलग पाचव्‍या दिवशी देशभरात दोन हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू | पुढारी

सलग पाचव्‍या दिवशी देशभरात दोन हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशात रविवारी दिवसभरात २ हजार २२ कोरोनाबाधितांची भर पडली. ४६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान २ हजार ९९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५%, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.६९ टक्के नोंदवण्यात आला. देशात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने २ हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधित आढळत आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३१ लाख ३६ हजार ३७१ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २५ लाख ९९ हजार १०२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १४ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २४ हजार ४५९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९२ कोटी ३८ लाख ४५ हजार ६१५ कोरोना डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.२८ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून ३ कोटी २८ लाखांहून अधिक बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ लशींपैकी १६ कोटी ४६ लाख ७० हजार ८०० लशी अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशात आतापर्यंत ८४ कोटी ७० लाख ९२ हजार २२६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २ लाख ९४ हजार ८१२ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button