खा. संजय राऊत : इंधन दर कपात ही केंद्राचीच जबाबदारी | पुढारी

खा. संजय राऊत : इंधन दर कपात ही केंद्राचीच जबाबदारी

मुंबई ऑनलाईन : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याची रक्कम पहिला द्यावी. त्यानंतर महाराष्ट्राकडे बोट दाखवावे. ही रक्कम आल्यानंतर इंधन दर कपातीबाबत काट करायचं, ते राज्य सरकार बघेल. इंधन दर कपात ही मुख्य जबाबदारी ही केंद्र सरकारचीच असून त्यांनी प्रथम त्यांची जबाबदारी पार पाडावी, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

पेट्रोल- डिझेलमध्ये आवाच्या-सव्वा  दरवाढ करायची, आणि नंतर ती कमी करायची म्हणजेच, पेट्रोल १५ रूपये वाढवाचे आणि ९ रूपये कमी करायचे हे म्हणजे केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेबरोबर खेळत आहे. प्रथम केंद्र सरकारने महाराष्ट्रच्या वाट्याची रक्कम द्यावी, त्यानंतर राज्यातील इंधन दर कपातीचा निर्णय हा मुख्यमंत्री घेतील, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, पंतप्रधान हेही पवारांचे मार्गदर्शन आणि सल्ला घेतात, त्यामुळे सर्वच नेत्यांनी त्यांचा आदर राखावा, असा टोला चंद्रकांत पाटीलांना त्यांनी दिला. दाऊत जिवंत आहे का ? ते केंद्र सरकारने पहिला पहावं. त्याला ताब्यात घ्यावं आणि त्याला समोर आणावं, असेही ते म्हणाले.

हेही वाचलत का ?

 

 

Back to top button