Aadhaar Card: बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत

Aadhaar Card: बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आधार कार्ड आपल्‍या बँकेतील बचत खात्‍याशी  लिंक करणे अनिवार्य आहे.तुम्ही बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर यामुळे तुम्हाला सरकारी कामात अडचणी येऊ शकतात. पाहूया बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक करतात ते.

तुम्ही तुमची बँक खाते आधार कार्डशी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे लिंक करू शकता. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करायचे असेल तर, त्या बँकेसाठी तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग सक्रिय असणे आवश्यक आहे.

मोबाइल ऍपद्वारे बँक खात्याशी आधार लिंक कसे करावे:

⦁ तुमच्या बँकेच्या मोबाइल ॲपवर लॉग इन करा.
⦁ 'माझे खाते' विभागातील 'सेवा' टॅबवर जा आणि 'आधार कार्ड तपशील पहा/अपडेट करा' पर्यायावर क्लिक करा.
⦁ तुमचा आधार क्रमांक दोनवेळा टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
⦁ आता तुम्हाला तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी योग्य प्रकारे लिंक करण्याबाबत एक संदेश मिळेल.
⦁ तुम्ही तुमच्या बँक शाखेत किंवा जवळच्या एटीएमला भेट देऊन ऑफलाइन मोडद्वारे तुमचे बँक खाते आधारशी लिंक करू शकता.
⦁ बँकेला भेट देऊन बँक खात्याशी आधार लिंक करा.
⦁ खातेदाराने आपले बँक खाते निष्क्रिय होऊ नये म्हणून खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे.

या प्रक्रियेचा वापर करुन  सहजपणे आधार लिंक करू शकता:

⦁ बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. हा आधार लिंकिंग फॉर्म तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
⦁ वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध नसल्यास तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
⦁ तुमचे बँक खाते तपशील आणि तुमचा आधार क्रमांक टाका.
⦁ फॉर्मसह तुमच्या आधार कार्डची साक्षांकित प्रत सबमिट करा.
⦁ आधार फॉर्म आणि फोटोकॉपी काउंटरवर सबमिट करा, जिथे तुम्हाला तुमचे मूळ आधार कार्ड पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले जाईल.
⦁ त्यानंतर तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आणि तुमचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
⦁ आधार लिंक झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर कळवले जाईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news