CNG : राजधानी दिल्लीत सीएनजी दरात २ रुपयांची वाढ

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा
इंधनाचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर असताना, सीएजनीच्या वाढत्या दरांच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. राजधानी दिल्लीत शनिवारी (दि.२१) सकाळी ६ वाजल्यापासून सीएनजी दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सीएनजीमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. १५ मे रोजीच दिल्लीतील सीएनजी दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
नवीन दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत सीएनजीचे दर प्रतिकिलो ७५.६१ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तर, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये देखील २ रुपयांच्या दरवाढीनंतर सीएनजीचे दर ७८.१७ रुपयांवर पोहचले आहेत. एनसीआर मधील गुरूग्राम मध्ये सीएनजीचे दर सर्वाधिक नोंदवण्यात आले आहे. येथे ८३.९४ रुपये प्रतिकिलो सीएनजीचे दर पोहचले आहेत.
Corona active Cases : देशात केवळ ०.०३ टक्के सक्रिय कोरोनाग्रस्त रूग्ण
दरम्यान देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर आहेत. मात्र शनिवारी (दि.२१) दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये तर, डिझेलचे दर ९६.६७ रुपये नोंदवण्यात आला. दिल्ली शेजारील नोएडात पेट्रोल १०५.४७ आणि डिझेल ९७.०३ रुपयांपर्यंत पोहचले आहे.
हेही वाचलंत का ?
- Monkeypox : युरोपसह १२ देशांत ‘मंकीपॉक्स’चा फैलाव, WHO ने व्यक्त केली चिंता, बोलावली तातडीची बैठक
- Cannes : आमच्यावरील रेप थांबवा; कान्समध्ये टॉपलेस महिलेकडून युक्रेन युद्धाचा निषेध
- Shehnaaz Kaur Gill : जॉर्जियाच्या पार्टीत पांढऱ्या कलरच्या कॉर्सेट टॉपमध्ये शहनाजचा जलवा (video)