वैष्णवी पाटील : 'चंद्रा' लाल महालात थिरकलीच कशी? | पुढारी

वैष्णवी पाटील : 'चंद्रा' लाल महालात थिरकलीच कशी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नृत्यांगणा वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वैष्णवी पाटीलने पुण्यातील ऐतिहासिक वास्तू लाल महाल येथे एका मराठी चित्रपटातील लावणीवर नृत्य केले आहे. तिने सध्या बहूचर्चित असलेला चित्रपट ‘चंद्रमुखी’ या गाण्यातील ‘चंद्रा’ ही लावणी सादर केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर विविध गटांनी आणि राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

 वैष्णवी पाटील
वैष्णवी पाटील

‘चंद्रा’ : काय आहे प्रकरण

नृत्यांगणा वैष्णवी पाटीलने (Vaishnavi Patil) पुण्यातील ऐतिहासिक वास्तू लाल महाल येथे एका लावणी नृत्य केले. ही लावणी ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटातील आहे. मराठी कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या बहुचर्चित कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात ‘चंद्रा’ या लावणीवर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नृत्य केले आहे. यावर अनेक जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ  केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यावर नृत्यांगणा  वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी शूट केलं. ही लावणी पुण्यातील लाल महाल येथे  शूट करुन तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. यावर संभाजी बिग्रेड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षसह इतर काही संघटनांनी विरोध करत निषेध केला. त्याचबरोबर जनतेतूनही संतापाची प्रतिक्रिया येत आहे. याप्रकरणी वैष्णवीसह तिघांच्यावर फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली चूक लक्षात येताच तिने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरुन डिलीट करत सर्वांची माफी मागितली आहे.

 वैष्णवी पाटील
वैष्णवी पाटील

आम्ही सर्वांची माफी मागतो – वैष्णवी पाटील

नृत्यांगणा वैष्णवी पाटीलने पुण्यातील ऐतिहासिक वास्तू लाल महालात ‘चंद्रा’ या लावणीवर नृत्य केले होते.  यावर अनेकजणांनी आक्षेप घेतला. तिला आपली चूक लक्षात येताच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत सर्वांची मागितली आहे. तिने माफिनाम्यात म्हटल आहे की, “नमस्कार, मी चंद्रा गाण्यावर डान्स केला, हे गाणं करताना माझ्या ध्यानीमनी काहीही नव्हतं, एक डान्सरच्या दृष्टिकोनातून मी हा डान्स केला, माझा  तुम्हा सर्व जनतेच मन दुखावण्याचा हेतू नव्हता, मीही एक शिवप्रेमी आहे, या एका व्हिडिओने ऐवढे काही  होइल असं वाटलं नव्हतं, जेव्हा माझी चूक लक्षात झाली तेव्हाच मी हा व्हिडिओ डिलीट केला.

मी माझी चूक मान्य करते, जेवढे शिवप्रेमी आहेत, माझ्या डान्सवर प्रेम करणारे आहेत त्यांचीही मी माफी मागते. जिजाऊ मॉं साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेस धक्का पोहचेल असा माझा काेणताही हेतू नव्हता, आणि कधी नसेलही, मीही एक शिवप्रेमी आहे, एक मराठी मुलगी आहे, शिवकन्या आहे. तरी सर्वांची मी मनापासून माफी मागते, मी सर्वांना वचन देते की,  मी असं पुन्हा कधी करणार नाही. खूप जणांना वाटतं की आम्ही हे प्रसिद्धीसाठी केलं, पण असं काहीही नाही. आज मी तुमच्या आशीर्वादानूसार मी इथे आहे. तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. मी सर्वांना आवाहन करते की, जेव्हा माझी चूक लक्षात आली तेव्हाच मी हा व्हिडिओ डिलीट केला. कृपया तुम्हीही हा व्हिडिओ डिलीट करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची मी माफी मागते.

या काळात आमच्यावर खूप अश्लील टीका झाली. पण अर्धवट ज्ञानातून, बालबुद्धीने हा व्हिडिओ केला, खरंच ही मोठी चूक आहे, आम्ही आमची चूक मान्य  केली, मायबाप रसिकांना माझी विनंती आहे ही चूक आमची मान्य करा यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचा, नेत्यांचा हात नाही. कृपया याला  राजकीय वळण देव नका असे आवाहन केले.”

 वैष्णवी पाटील
वैष्णवी पाटील

Chandramukhi :’चंद्रमुखी’

हा चित्रपट मराठी कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या बहुचर्चित कादंबरीवर आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्राची (Amruta Khanvilkar) आणि आदीनाथ कोठारेने(Adinath Kothare)  दौलतची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील व्हायरलं झालेले गाणं म्हणजे चंद्रा. या गाण्याचे रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक, पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर तर चित्रपटाला अजय -अतुल यांचे  संगीत यांनी दिले आहे.   

हेही वाचलंत का?

 

Back to top button