IPL 2022 : रियान परागनं मोडला रोहित शर्मा आणि जडेजाचा विक्रम, अशी कामगिरी करणारा बनला पहिला खेळाडू | पुढारी

IPL 2022 : रियान परागनं मोडला रोहित शर्मा आणि जडेजाचा विक्रम, अशी कामगिरी करणारा बनला पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीलमध्ये (IPL 2022) सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान पराग याच्या नावावर झाला आहे. त्याने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर असणारा हा विक्रम मोडीत काढत आपला नवा विक्रम केला आहे. जडेजा आणि शर्माचे प्रत्येकी १३ झेलचे रेकॉर्ड होते. तर रियानचे आतापर्यंत या सीझनमधील १५ झेल झाले आहेत. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात परागने मोईन अली आणि नारायण जगदीसन यांचे झेल घेऊन हा विक्रम केला.

Quinton De Kock : ‘षटकारांचे शतक’ झळकावणारा डिकॉक पहिला विदेशी विकेटकीपर फलंदाज!

राजस्थानने 3.80 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या रियान परागने फलंदाजीमध्ये २०२२ च्या आयपील सिझनमध्ये आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये १७.११ च्या सरासरीने आणि १४८.०८ च्या स्ट्राइक रेटने १५४ धावा केल्या आहे. तो दोनदा नाबाद राहिला आहे. त्याने अलीकडेच बंगळूरविरुद्ध ५६ धावांची नाबाद सामना जिंकणारी खेळी खेळली.

आयपीएलमध्ये सर्वांधिक झेल घेणारा पराग हा दुसरा खेळाडू

आयपीएलच्या (IPL 2022) एकाच मोसमात सर्वाधिक झेल घेणारा रियान पराग हा दुसरा खेळाडू ठरला असून त्याच्या पुढे आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी खेळाडू डिव्हिलियर्स आहे, ज्याने आयपीएलच्या एकाच सीझनमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केला आहे. डिव्हिलियर्सने २००१९ मध्ये १९ झेल घेतले होते. पराग आता यामध्ये १५ झेलांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी किरॉन पोलार्ड १५ झेलांसह तिसऱ्या, डेव्हिड मिलर आणि ड्वेन ब्राव्हो १४-१४ झेलांसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

हेही नक्की वाचा….

Back to top button