IPL 2022 Playoff : आयपीएल ‘प्‍ले ऑफ’मध्ये तीन स्‍थानांसाठी चुरस | पुढारी

IPL 2022 Playoff : आयपीएल 'प्‍ले ऑफ'मध्ये तीन स्‍थानांसाठी चुरस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमअर लीग (IPL) २०२२ स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात पोहचली आहे. प्‍ले ऑफसाठी गुणतालिकेत अव्‍वल स्‍थानी असणार्‍या गुजरातचे स्‍थान निश्‍चित झालं आहे. (IPL 2022 Playoff) सध्‍या प्‍ले ऑफच्‍या अन्‍य तीन स्‍थानांसाठी पाच संघात चुरस आहे.

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरी आरसीबीसह चार संघांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. 21 मे रोजी मुंबईने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यास RCB प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. मात्र यासाठी आरसीबीला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागेल.

जर दिल्लीने मुंबईला हरवले तर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल कारण गुजरातविरुद्धच्या विजयानंतर त्यांचे 16 गुण होतील, परंतु नेट रनरेटच्या बाबतीत लखनौ आणि दिल्लीला मागे टाकणे खूप कठीण आहे.

आयपीएल स्‍पर्धेच्‍या साखळी सामन्‍यांमधील सहा सामने बाकी आहेत. गुजरातपाठोपाठ राजस्‍थान रॉयल्‍स आणि लखनौ सुपर जायंट्‍सचा प्‍ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. सध्‍या हे दोन्‍ही संघ अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्‍थानी आहेत. आता हे दोन्‍ही संघ अधिक धावांच्‍या फरकांनी हरले तरच ते प्‍ले ऑफमधून बाहेर पडतील, सध्‍या तरी हे अशक्‍यच असल्‍याने या संघाचाही प्‍ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित असल्‍याचे मानले जात आहे.

IPL 2022 Playoff : आता सारं समीकरण ‘जर-तर’ वर

१५ मे रोजी लखनौ सुपर जायंट्‍सविरोधात राजस्‍थानचा विजय झाला. त्‍यामुळे या संघाने दुसर्‍या स्‍थानी झेप घेतली आहे. आता साखळी सामन्‍यात त्‍यांना मुंबईविरोधात मोठा पराभवापासून स्‍वत:ला वाचवावे लागेल. त्‍यामुळे राजस्‍थानचा संघ प्‍ले ऑफमध्‍ये गेल्‍यासारखाच मानले जात आहे. मागील आठड्यात लखनौचा संघ प्रथमस्‍थानी होता. आता तो तिसर्‍या स्‍थानावर पोहचला आहे. कारण या संघाचा सलग दोन सामन्‍यात पराभव झाला आहे. आता कोलकाताविरोधातील सामना मोठ्या फरकाने हरला तरच लखनौचे प्‍ले ऑफमधील स्‍थान धोक्‍यात येणार आहे.

क्रिकेट हा खेळच अश्‍चिततेचा मानला जातो. राजस्‍थान आणि लखनौ संघाने आपला शेवटचा सामना हरला तर रॉयल चैलंजर्स बंगळूच्या संघाने गुजरातला आणि दिल्‍लीच्‍या संघाने मुंबईला मोठ्या धावसंख्‍येने हरवले तर सर्व गणित हे रनरेटवर असेल. कारण राजस्‍थान, लखनौ, बंगळूर आणि दिल्‍ली या संघांच्‍या नावावर प्रत्‍येकी १६ गुण होतील. ज्‍या संघाचा रनरेट सर्वात चांगला असेल तोच प्‍ले ऑफमध्‍ये खेळेल.

सध्‍या बंगळूर संघाचा रनरेट वजा ०.३२३ इतका आहे. बंगळूरला गुजरातच्‍या संघास किमान ७५ धावांनी हरवावे लागणार आहे. तर लखनौला कोलकाताविरुद्‍चा सामना ७५ पेक्षा अधिक धावांनी तर राजस्‍थानला आपला अखेरचा साखळी सामना ८० पेक्षा अधिक धावांनी जिंकावा लागणार आहे. सध्‍या तरी लखनौ आणि राजस्‍थान हे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमाकांचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता चौथ्‍या स्‍थानासाठी पंजाब, दिल्‍ली, बंगळूर, कोलकाता या संघांना दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button