नगर : जिल्‍हा न्यायालयाच्या आवारात तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्‍न | पुढारी

नगर : जिल्‍हा न्यायालयाच्या आवारात तरुणाचा अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्‍न

नगर ; पुढारी वृत्‍तसेवा अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना वेळीच लक्षात आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी धाव घेऊन त्‍याला वाचवले. ऋषिकेश विठ्ठल ढवान ( रा. बाभुळगाव ता राहुरी ) असे जाळून घेण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

ऋषिकेश ढवान याला  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ऋषिकेश ढवान आणि त्‍यांच्‍या पत्नीमधील वादावर  न्यायालयात खटला सुरु असल्‍याच समजते.  या तणावातूनच त्‍याने जाळून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : 

Back to top button