इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर : तब्बल साडेसहा वर्षांनंतर दिलासा | पुढारी

इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर : तब्बल साडेसहा वर्षांनंतर दिलासा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला. तब्बल साडेसहा वर्षे ती कारागृहात हाेती. मुलगी शीना बाेराची हत्‍या केल्‍याचा आराेप इंद्राणीवर आहे.

 

इंद्राणी मुखर्जी हिने साडेसहा वर्षे तुरुंगात काढलेली आहेत. तसेच या प्रकरणीच्या खटल्याची सुनावणी लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे तिला जामीनअर्ज मंजूर केला जात असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. शीना बोरा हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी व इंद्राणी मुखर्जीचा तत्कालीन पती पीटर मुखर्जी याला फेब्रुवारी 2020 मध्येच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पीटर मुखर्जीला ज्या अटींवर जामीन देण्यात आला होता त्याच अटी-शर्तीवर इंद्राणीला जामीन देण्यात आला आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने वारंवार जामीन अर्ज फेटाळल्यानंतर इंद्राणी मुखर्जी हिने गत मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. इंद्राणी ही प्रभावशाली महिला असून, तिला जामीन देण्यात आला तर ती पुराव्यांशी छेडछाड करु शकते, असे सीबीआयने आपल्या युक्तिवादात म्हटले होते.

हेही वाचा ?

Back to top button