मोबाईलचे दुकान फोडून दौंडमध्ये ३० लाखाचा ऐवज चोरला | पुढारी

मोबाईलचे दुकान फोडून दौंडमध्ये ३० लाखाचा ऐवज चोरला

दौंड: पुढारी वृत्तसेवा 
दौंड शहरातील शिवाजी चौक येथील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान  मध्यरात्री  तीनच्या सुमारास फोडुन चोरट्यांनी दुकानातील मोबाईल घड्याळे आणि रोख रक्कम असा मिळून जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. या चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्हीही तोडून टाकले. हे चोरटे जवळपास दोन ते अडीच तास दुकानात होते. ही चोरी त्यांनी अत्यंत शिताफीने केली.
या चोरट्यांनी दुकानात असलेल्या मोबाईल बॉक्समधील मोबाईल  व चार्जर घेऊन गेले. तसेच दुकानातील घड्याळे, इतर किंमती वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेली. दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दौंड पोलीस स्थानकात माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, विशाल जावळे, पांडुरंग थोरात, आसिफ शेख यांनी मिळून या दुकानाच्या आजूबाजूची कसून तपासणी केली. आजूबाजूच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. त्यांना लवकरच अटक करू, असे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यानी सांगितले
हेही वाचा:

Back to top button