Corbevax : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीच्‍या काेराेना प्रतिबंधक कॉर्बेवॅक्स लसीच्या किंमतीत मोठी कपात | पुढारी

Corbevax : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीच्‍या काेराेना प्रतिबंधक कॉर्बेवॅक्स लसीच्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीच्या कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीच्या किंमतीत बायोलॉजीकल- ई कंपनीने मोठी कपात केली आहे. कोरोना नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या या लसीची किंमत 840 रुपये इतकी होती. आता ती 250 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

खासगी लसीकरण केंद्रांकडून याआधी एका डोससाठी ९०० रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जात असे. मात्र आता एका डोससाठी चारशे रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जाणार आहे. १२ ते १४ वयोगटातील सुमारे तीन कोटी मुलांना आतापर्यंत कॉर्बेवॅक्स लस देण्यात आली आहे. या वयोगटातील मुलांना लस देण्याच्या मोहिमेला गत मार्च महिन्यापासून सुरुवात झाली होती. सरकारी लसीकरण केंद्रासाठी या लसीची किंमत १४५ रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button