Daisy Shah in Maldives : समुद्रावर ब्लॅक मोनोकिनीमध्ये डेझीचा लूक | पुढारी

Daisy Shah in Maldives : समुद्रावर ब्लॅक मोनोकिनीमध्ये डेझीचा लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क

लाईमलाईटपासून दूर असलेली डेझी शाहने सोशल मीडियावर धमाकेदार एन्ट्री घेतलेली दिसते. तिने मालदिवमधून काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Daisy Shah in Maldives) काही व्हिडीओदेखील तिने शेअर केले आहेत. पण, सर्वात लक्ष वेधून घेणारा फोटो म्हणजेडेझीची मोनोकिनी. डेझीने ब्लॅक बिकिनी घालून समुद्रावर जाळीदार झुल्यावर फोटोशूट केला आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधणारा ठरला आहे. (Daisy Shah in Maldives)

ब्लॅक लव्हर डेझी

डेझी शाहने या मोनोकिनीसोबत Smile, swim, sunset 😍 #amtopm अशी कॅप्शन लिहिली आहे. आणखी काही फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचेच फोटो वापरले आहेत.

जय हो आणि हेट स्टोरी-३ या चित्रपटातून डेझी शाहने आपली ओळख निर्माण केली होती. सुपरस्टार सलमान खान सोबत तिला डेब्यू करण्याची संधी मिळाली.  तिने सलमान खानसोबत ‘जय हो’ या चित्रपटातून डेब्यू करून लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला चांगलीच पसंती मिळाली होती, तर तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी डेझीला खूप कष्ट करावे लागले. एक काळ असा होता जेव्हा ती चित्रपटांमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करत असे.

डेझीचा जन्म २५ ऑगस्ट, १९८४ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. तिचे वडील कापड गिरणीत काम करायचे. डेझीचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच केले. ती मिस डोंबिवली म्हणूनही निवडली गेली. डेझीने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत असिस्टंट म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

२००३ मध्ये सलमान खानच्या ‘ओ जाना’ आणि ‘लगन लागी’ या गाण्यांमध्ये डेझी बॅक स्टेज डान्स करताना दिसली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ती ‘हमको दीवाना कर गये’ या चित्रपटात ती दिसली. यानंतर ती साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. डेझीने २०११ मध्ये कन्नड चित्रपट भद्रा केला. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते; पण तिला ‘जय हो’ चित्रपटातून ओळख मिळाली. यामध्ये तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळेल. यानंतर डेझी ‘हेट स्टोरी ३’ आणि ‘रेस ३’ मध्येही दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

Back to top button